शेलपिंपळगाव प्रीमिअर लीगमध्ये शिरसाट विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:12 IST2021-02-09T04:12:28+5:302021-02-09T04:12:28+5:30

पुणे जिल्ह्यातील नामवंत बत्तीस संघांनी हा स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे 'एक गाव-एक संघ' या प्रकारात संघांना सहभागी ...

Shirsat wins Shelpimpalgaon Premier League | शेलपिंपळगाव प्रीमिअर लीगमध्ये शिरसाट विजयी

शेलपिंपळगाव प्रीमिअर लीगमध्ये शिरसाट विजयी

पुणे जिल्ह्यातील नामवंत बत्तीस संघांनी हा स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे 'एक गाव-एक संघ' या प्रकारात संघांना सहभागी करून घेण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ उद्योजक प्रणव कड, ॲड. महेश भिवरे, बाळासाहेब लोखंडे, स्वप्नील मोहिते, महेश मोहिते, निखिल मोहिते, विकास मोहिते, प्रवीण मोहिते, मंगेश भोसकर, योगेश शिवले, दिगंबर लोणारी, अजित चौधरी, महेंद्र घेनंद, तुषार मुटके, विनोद चौधरी, ॲड. योगेश मोहिते, सुमित मोहिते, महेश मोहिते, जीवन लोखंडे आदींच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून बजरंग चौधरी यांनी काम केले. सामन्याचे समालोचन रवी जाधव यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रिकेट क्लब व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

--

स्पर्धेचा निकाल असा

प्रथम क्रमांक - अमोल शिरसाट स्पोर्ट्स, कोंढवा. द्वितीय क्रमांक - जय हनुमान क्रिकेट क्लब, शेलपिंपळगाव. तृतीय क्रमांक - स्व. सचिनपापा सूर्यकांत भंडलकर, खेड. चतुर्थ क्रमांक - एस.बी.एम.सी.सी. महांळुगे.

--

फोटो क्रमांक - ०८शेलपिंपळगाव क्रिकेट स्पर्धा

फोटो ओळ : मोहितेवाडी (ता. खेड) येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेला अमोल शिरसाट स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू.

Web Title: Shirsat wins Shelpimpalgaon Premier League