शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शैक्षणिक धोरणावर शिंदेवाडीच्या युवकाचा ‘ठसा’

By admin | Updated: February 4, 2015 00:25 IST

राष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी बारामती-माळशिरस तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या शिंदेवाडी येथील युवकाच्या कल्पकतेतून बोधचिन्हाची निर्मिती झाली आहे.

रविकिरण सासवडे - बारामतीराष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी बारामती-माळशिरस तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या शिंदेवाडी येथील युवकाच्या कल्पकतेतून बोधचिन्हाची निर्मिती झाली आहे. देशभरातून जवळपास तीन हजार स्पर्धकांनी यासाठी बोधचिन्ह तयार केले होते. त्यातून नवाज नजीर शेख यांच्या बोधचिन्हाची निवड केंद्र शासनाने केली आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्याने कल्पकतेचे कंगोरो उलगडले. या तरुणाचे कौतुक करण्यासाठी सारा गाव लोटला होता. सोलापूर जिल्ह्यातील शिंदेवाडी गावात राहणारे नवाज शेख असे या युवकाचे नाव आहे. ‘राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था’ येथे तांत्रिक अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत. सध्या येथेच माधुरी ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एड्स-रोगप्रतीकारशक्ती’ या विषयावर पीएच.डी. करीत आहेत. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी बोधचिन्हाची स्पर्धा घेतली होती. देशभरातून जवळपास तीन हजार स्पर्धकांनी यासाठी बोधचिन्ह तयार केले होते. त्यातून नवाज यांच्या बोधचिन्हाची निवड शासनाने केली आहे. नवाज यांना २७ जानेवारीला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बोधचिन्हाची निवड झाल्याचे कळवले. हा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नव्हता, असे नवाज यांनी सांगितले. नवाज यांचे आई-वडिलांना अल्पशिक्षीत आहेत. त्यांच्या सर्वत्र होणारे कौतुक व केंद्र सरकारने केलेल्या सन्मानामुळे आई-वडीलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. नवाजने नाव कमावल्यामुळे सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया नवाज यांचे वडील नजीर शेख यांनी व्यक्त केली. त्यांना ही रेखाटन कला शिक्षक असलेल्या त्यांच्या मामांकडून मिळाल्याचे नवाज आवर्जून सांगतात. नवाज यांच्या बोधचिन्हाच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात असणारे शिंदेवाडी गाव एकदम राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आले आहे. शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनाही नवाज यांच्या यशाबद्दल सार्थ अभिमानवाटत आहे. सरकारी शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक व्हावा, हाच यामागचा उद्देश होता. त्यासाठी शिक्षणाचे प्रतीक म्हणून या बोधचिन्हामध्ये पुस्तक दाखवण्यात आले आहे. तेच पुस्तक हाताच्या ओंजळीप्रमाणे दिसत आहे. त्याच्यावर मानवी आकृती आहे. त्याच्याभोवती पृथ्वीचे प्रतीक म्हणून गोल काढण्यात आला आहे. तसेच, शासन ज्या बारा घटकांच्या आधारे शैक्षणिक धोरण राबवणार आहे ते बारा घटक चांदण्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहेत. याचा अर्थ असा, की शिक्षण तुमची काळजी घेते व तसेच ते तुम्हाला एक वैश्विक ओळखदेखील मिळवून देऊ शकते.’ ‘सरकारी शाळांकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन सकारात्मक व्हावा. शासन नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे. त्यामध्ये देशाचा नागरिक म्हणून आपलाही सहभाग असावा, असे वाटत होते. बोधचिन्हाची निवड झाल्याने आनंद वाटत आहे.’- नवाज शेख