कडूस सोसायटीला मानाची ढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST2021-02-24T04:10:15+5:302021-02-24T04:10:15+5:30

कडूस विकास सोसायटीचे अध्यक्ष मोढवे यांच्यासह सर्व संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी बॅंकेच्यावतीने सन २०१७ ला माजी ...

A shield of honor to the Kadus Society | कडूस सोसायटीला मानाची ढाल

कडूस सोसायटीला मानाची ढाल

कडूस विकास सोसायटीचे अध्यक्ष मोढवे यांच्यासह सर्व संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी बॅंकेच्यावतीने सन २०१७ ला माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कडूस सोसायटीला सहकार गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पुण्यात अल्पबचत भवनातील पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, प्रतापसिंह चव्हाण, विभागीय अधिकारी विलास भास्कर, सचिव दादासाहेब कल्हाटकर, मुरलीधर ढोरे, अशोक शेंडे, प्रताप ढमाले पा., दामोधर बंदावणे, उपाध्यक्ष चंद्रकांत पारधी, बाजीराव शिंदे, साईनाथ गारगोटे, ज्ञानेश्वर ढमाले पाटील, साहेबराव ढमाले, सुधीर जाधव, लक्ष्मण मुसळे, रंगनाथ अरगडे आदी संचालक मंडळ उपस्थित होते.

- कडूस सोसायटीला मानाच्या ढालीचा पुरस्कार दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना संचालक मंडळ.

Web Title: A shield of honor to the Kadus Society