आधी विवाहित असतानाही तिने पुन्हा केले लग्न; तरुणाने साखरपुड्याच्या दिवशीच संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:13 PM2020-09-17T14:13:53+5:302020-09-17T14:14:37+5:30

तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. आता ती त्याला तक्रार करण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती..

She remarried even though she had been married before; The young man ended his life on the day of ring ceremoney | आधी विवाहित असतानाही तिने पुन्हा केले लग्न; तरुणाने साखरपुड्याच्या दिवशीच संपवले जीवन 

आधी विवाहित असतानाही तिने पुन्हा केले लग्न; तरुणाने साखरपुड्याच्या दिवशीच संपवले जीवन 

Next
ठळक मुद्देकोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केला कथित पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : तरुण आणि एक तरुणी यांच्यात ५ वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांनी परस्पर रजिस्टर लग्न देखील केले. परंतु त्यांनी ही बाब घरच्यांना सांगितली नाही. त्याचा फायदा घेऊन तिने या तरुणाचा मानसिक छळ सुरु केला. आधी लग्न झालेले असताना देखील तिने त्याला आपल्या जाळयात ओढलॆ  त्रासाला कंटाळून २८ वर्षाच्या तरुणाने साखरपुडा ठरलेला असताना आदल्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस कारणीभूत झाल्याप्रकरणी तरुणाच्या कथित पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी या तरुणाच्या काकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना उंड्रीमध्ये २८ जून २०२० रोजी सायंकाळी घडली होती.
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी माहिती दिली. हा तरुण आणि एक तरुणी यांच्यात ५ वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांनी गुपचूप रजिस्टर लग्न केले होते. मात्र, त्यांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना न सांगता ते दोघेही आपापल्या घरी राहत होते. अधून मधून ते बाहेर भेटत होते. बाहेर भेटत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध आले. तरुणाचे कुटुंब सुखवस्तू आहे. या तरुणीचे अगोदरच लग्न झाले होते. असे असताना तिने या तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. आता ती त्याला तक्रार करण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यावर ते ही या तरुणाला मानसिक त्रास देऊ लागले. 

इकडे तरुणाच्या घरच्यांना याची काहीही माहिती नसल्याने त्यांनी त्याचे नात्यात लग्न ठरविले होते. ही गोष्ट त्याच्या कथित पत्नीला समजल्यावर तिने त्याला पळून जाण्यासाठी दडपण आणू लागली़. जर पळून आला नाही तर सर्व उघड करण्याची धमकी ती देऊ लागली. त्याला कंटाळून या तरुणाने साखरपुड्याच्या आदल्या दिवशी गच्चीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. 
या आत्महत्येचा तपास करीत असताना या तरुणाच्या मित्रांकडून त्याचे रजिस्टर लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन घटनेच्या दिवशी तिचे ५ -६ फोन या तरुणाला आलेले निष्पन्न झाले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: She remarried even though she had been married before; The young man ended his life on the day of ring ceremoney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.