शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून तीव्र टंचाई

By admin | Updated: May 11, 2015 05:57 IST

नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला.

भोर : नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला. त्यानंतर एकदाच टॅँकर आला होता. यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण सुरु असून, अर्धा किलोमीटरवर असलेल्या शिवकालीन साठवण विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. तसेच येथील पाणी खराब झाले असून, हेच दूषित पाणी लोकांना प्यावे लागत असून, ६ ते ७ हांडे वाटून घेतात. जनावरांना पाण्यासाठी ६ किलोमीटरवर असलेल्या नीरा देवघर धरणावर घेऊन जावे लागते. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील महिलांसह ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. नीरा देवघर धरणाच्या काठावर सुमारे ६०० ते ७०० लोकवस्तीचे निवंगण हे गाव असून, दोन वाड्या आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून गावात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे रायरेश्वर किल्ल्यावरुन उताराची नळ पाणीपुरवठा योजना २० वर्षांपूर्वी करण्यात आली आहे; मात्र गावाची लोकसंख्या वाढल्याने व दिवसेंदिवस पाणी कमीकमी होत गेल्याने दर उन्हाळ्यात सदरच्या योजनेला पाणी कमी पडत आहे. सन २००७मध्ये गावापासून एक किलोमीटर रिंगरोडजवळच्या शेतात शिवकालीन साठवण विहीर बांधण्यात आली आहे; मात्र सदरच्या विहिरीलाही मार्च महिन्यापर्यंतच पाणी असते, नंतर पाणी कमीकमी होत जाऊन खराब होत जाते. त्यामुळे टॅँकरची मागणी करावी लागत असल्याचे सरपंच किसन दिघे व आनंदा दिघे यांनी सांगितले.या वेळी टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला; मात्र गावात फक्त ४ व ७ मे रोजी दोन वेळा अर्धा अर्धा टॅँकर गावात आला. त्यानंतर टॅँकर फिरकलाच नसल्याचे प्रवीण दिघे व अंकुश दिघे यांनी सांगितले. (वार्ताहर)दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यातदरवर्षी उन्हाळ्यात महिलांना शिवकालीन विहिरीवरून पायपीट करून पाणी आणावे लागते. सदरचे पाणी कमी झाल्याने खराब झाले असून, दूषित झाले आहे; मात्र गावात इतरत्र कुठेच पाण्याची सोय नसल्याने हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर टँकर सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.