शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:53 IST

इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले.

पुणे : कोरोनावरील लस बनवून जगाला दिलासा देणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २१) दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी इन्स्टिट्यूटमधील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर लागलेली ही आग सायंकाळी साडेपाच वाजता आटोक्यात आली. कोरोनावरील कोविशिल्ड या लस उत्पादनाला आगीपासून कोणताही धोका पोहोचलेला नाही.इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर दोन्ही मजल्यांवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी होरपळलेल्या ५ व्यक्ती आढळल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोरोना लस उत्पादन सुरक्षित -सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन जोरात सुरू आहे. येथून देशात आणि देशाबाहेर दररोज लक्षावधी लसी जात आहेत. त्यामुळे ‘सीरम’मधील आगीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. केंद्रीय गृहमंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही या घटनेची तातडीने चौकशी करण्यात आली. मात्र, कोरोना लस उत्पादनाला आगीची कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एकापाठोपाठ ३ स्फोटांनी हादरला परिसर -आग लागली असतानाच दुपारी ३ वाजता पहिला स्फोट झाला. दुसरा स्फोट ३ वाजून २५ मिनिटांनी झाला. पाठोपाठ तिसरा स्फोट झाल्याचा आवाज आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या इमारतीत कोणतेही उत्पादन सुरू नव्हते. आग प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून वाचवला जीव -- मांजरी गावाजवळच्या एसईझेडमध्ये सीरम इन्स्टिट्यूटचा प्रकल्प आहे. तेथे काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. काही कामगार इमारतीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. - काही जणांनी तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उड्या मारून जीव वाचविला. या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बीसीजी लसीचे उत्पादन घेण्यात येणार होते.

मुख्यमंत्री करणार पाहणी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.

टॅग्स :fireआगPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंfire brigade puneपुणे अग्निशामक दलFire Brigadeअग्निशमन दल