शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

By admin | Updated: July 3, 2017 03:22 IST

मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौकात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात

लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौकात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागेवर मृत्यू झाला. राजकीय वादात अडकलेल्या या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
रविवारी (दि. २) दुपारी १२.१० वा. कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या एमएच १२ एच. डी. ०१४९ हा ट्रक व कात्रज तलावाकडून राजस चौकात आलेली दुचाकी एमएच १२ एन.एम. ८१५२ यांच्यात झालेल्या अपघातात नवनाथ थिटे (वय ६५, रा. शिवप्रभा सोसायटी, शेलारमळा, कात्रज) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचालक व मृत नवनाथ थिटे यांचा मुलगा सतीश नवनाथ थिटे (वय ३७) गंभीर जखमी झाले
आहेत.
या घटनेवेळी स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम, नगरसेवक वसंत मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी सतीश थिटे यांना कात्रज येथील साई स्नेह हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान ट्रकचालक हा गाडी घेऊन घटनास्थळापासून पळून जात असताना नगरसेवक वसंत मोरे यांनी आपली गाडी त्या ट्रकला आडवी घालून ट्रक थांबवली व त्या ट्रक चालकाला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर ढगे, सहा. पोलीस निरीक्षक विलास भुजबळ यांनी विस्कळीत झालेली वाहतूक नियंत्रित केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

श्रेयवादाची लढाई बंद व्हावी
या रस्त्याचे काम करण्याचे श्रेय घेण्याच्या नावाखाली मागील अनेक वर्षांपासून राजकीय अडथळे आणले जात आहेत. मात्र जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किंवा श्रेयासाठी या होणाऱ्या विकासकामाला खोडा घालण्याचे काम करू नये. लोकप्रतिनिधींनी श्रेयवादाची लढाई बंद करून हा रस्ता तातडीने मोठा करून या रस्त्याला मृत्यूच्या सापळ्यातून मुक्त करावे, अशी अपेक्षा येथील समान्य नागरिक करीत आहेत.