शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा धुमाकूळ; पळसपट्टीचे ग्रामस्थ दहशतीत

By admin | Updated: August 30, 2015 02:59 IST

पळसपट्टी या भागातील नाना टुले यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने रात्रीच्या वेळी शेळीवर हल्ला केला. परंतु शेळीच्या ओरडण्याने सावध झालेल्या शेतकऱ्यांनी

राजणगाव सांडस : पळसपट्टी या भागातील नाना टुले यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने रात्रीच्या वेळी शेळीवर हल्ला केला. परंतु शेळीच्या ओरडण्याने सावध झालेल्या शेतकऱ्यांनी फटाक्यांच्या आवाजाने बिबट्याला पळवून लावले. मात्र बिबट्याच्या या हल्ल्याने निर्माण झालेल्या दहशतीने ग्रामस्थ मात्र धास्तावले आहेत. पळसपट्टी भागात बिबट्या फिरत असल्याने या भागातील शेतकरी महिला शेतातील कामे करण्यास मजुरीवर जायलाही घाबरत आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून, वारंवार वनविभागास कळवूनदेखील या भागात बिबट्यास पकडण्यासाठी कोणतीही कारवाई वनविभागाकडून होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरेही लावलेले नाहीत. त्यामुळे धास्तावलेले नागरिक या सुस्त कारवाईवर संतप्त झालेले आहेत. रात्रीच्या वेळी आलेल्या बिबट्याने गोठ्यातून पाळीव शेळीला ओढून नेले. परंतु शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक जागे झाले. बिबट्याने शेळीला उसाच्या शेतात ओढत नेले. आसपासच्या शेतकऱ्यांनी बॅटरीचा उजेड टाकला तेव्हा बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. या भागातील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून बिबट्यास पळवून लावले.