शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पुस्तकांनाही स्वामित्व हक्क कायदा

By admin | Updated: August 5, 2015 02:59 IST

बोधचिन्हांची कायदेशीर लढाई लढावी लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) शालेय पाठ्यपुस्तकांच्या स्वामित्व

पुणे : बोधचिन्हांची कायदेशीर लढाई लढावी लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) शालेय पाठ्यपुस्तकांच्या स्वामित्व हक्क कायद्याबाबत सजग झाले आहे. सर्व शालेय पाठ्यपुस्तकांना स्वामित्व हक्क कायदा लागू करण्यासंदर्भात बालभारतीने कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत.शालेय पुस्तकाचे वाचन करीत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी असे बालभारतीचे बोधचिन्ह मध्यंतरी एका चित्रपटात वापरण्यात आले. त्या चित्रपटाच्या नावापासूनच सर्व गोष्टी शालेय विद्यार्थ्यांसाठी अनिष्ट होत्या. त्यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर बालभारतीने संबधित निर्मात्यावर कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली. त्यानंतर बोधचिन्हाचा वापर त्या निर्मात्याकडून थांबवण्यात आला.या प्रकारानंतरच शालेय पुस्तकेही स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत नोंदणी करून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारतीकडून केली जाते. त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञांचे खास संपादकीय मंडळ नियुक्त करण्यात येते. विविध लेखकांच्या निवडक साहित्यामधून उत्कृष्ट लिखाण निवडून त्याचा समावेश धडा म्हणून करण्यात येतो. ज्या लेखकाचे साहित्य घेतले त्यांना किंवा त्यांच्या वारसांना बालभारतीकडून मानधन (रॉयल्टी) देऊन त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते.इतके प्रयास करून तयार केलेल्या या पाठ्यपुस्तकांचा गेली अनेक वर्षे शालेय साहित्य तयार करणाऱ्यांकडून व्यावसायिक वापर केला जातो. गाईड, प्रश्नसंच, टिपा अशा विविध प्रकारांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे साहित्य अनेक कंपन्यांकडून तयार केले जाते व त्याची विक्री होत असते. या साहित्याची एक वेगळी बाजारपेठच असून, त्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.(प्रतिनिधी)