शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आंदोलकांविरुद्ध फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात जबरदस्तीने घुसून आंदोलन करणऱ्या आणि ऐतिहासिक इमारतीमध्ये तोडफोड करणाऱ्या अखिल ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात जबरदस्तीने घुसून आंदोलन करणऱ्या आणि ऐतिहासिक इमारतीमध्ये तोडफोड करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलिसांकडे फिर्याद दिली. विद्यापीठाने परीक्षा न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे. या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ठिय्या आंदोलन करत घोषणा दिल्या. मात्र, आंदोलनाचा मार्ग चुकीचा असल्याने ही कारवाई केली जात असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठांनी केवळ अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. तर, इतर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या पूर्वीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन जाहीर केला. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठात आंदोलन केले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा झाली. तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्थापन केलेल्या समितीद्वारे प्रत्यक्ष खर्चाचा आढावा घेऊन अधिकार मंडळाच्या मान्यतेने शुल्क परताव्याबाबत परिपत्रक काढले जाईल, असा निर्णय घेतला. परंतु, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयाच्या अधिन राहून विद्यापीठातर्फे शुल्क परताव्याची अंमलबजावणी केली जाईल, असे लेखी पत्र विद्यापीठाने अभाविपला दिले आहे.

--

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये बळजबरीने घुसून इमारतीमधील सभागृहाचे नुकसान केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातर्फे संबंधित कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली जाणार आहे. तसेच अभाविपने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत अभाविपला लेखी पत्र दिले आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

--

अभाविपच्या मागणीनुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला. परंतु, आंदोलक कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे आंदोलकांविरोधात पोलिसांकडे फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ