मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:12 IST2026-03-14T16:11:42+5:302026-03-14T16:12:32+5:30

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडे मोफत दिली होती.

Sattur attacks cemetery employee over free cow dung firewood three arrested | मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक

मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक

पुणे : मित्राच्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत गोवऱ्या व लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील टेंडरधारक व्यावसायिकाने विद्युत स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सत्तूरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पाषाण येथे घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत सचिन उत्तम रणपिसे (वय ३५, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय अशोक माकर (वय २५), अतिश मारुती चव्हाण (२७) आणि रामू नर्सराज मुप्पाला (३२) यांना अटक करण्यात आली आहे. 

ही घटना ११ मार्च रोजी रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास पाषाण येथील शिवशक्ती चौकाजवळ बालन सुतार यांच्या कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन रणपिसे हे औंध स्मशानभूमीत स्मशान ऑपरेटर म्हणून काम करतात. अजय माकर याला सुतारवाडी स्मशानभूमीत गोवऱ्या व लाकडे पुरवण्याचे टेंडर मिळाले आहे. दरम्यान, रणपिसे यांचा मित्र रोहित आडुळकर यांच्या चुलत्यांचे निधन झाले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रणपिसे यांनी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडे मोफत दिली होती.

याचा राग मनात धरून अजय माकर याने ११ मार्च रोजी रात्री रणपिसे यांना विठ्ठल मंदिराजवळ बोलावले. तेथे माकरने “तू लाकडे व गोवऱ्या फुकट का दिल्या?” असा जाब विचारत शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर त्याच्या साथीदारांनी रणपिसे यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली. त्यानंतर माकरने सत्तूरने त्यांच्या दोन्ही खांद्यांवर वार केले, तर तिसऱ्या आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. जखमी रणपिसे यांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. बाणेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक बालाजी सानप पुढील तपास करत आहेत.

Web Title : मुफ्त लकड़ी देने पर श्मशान कर्मचारी पर हमला; तीन गिरफ्तार।

Web Summary : पुणे में एक अंतिम संस्कार के लिए मुफ्त लकड़ी देने पर एक श्मशान कर्मचारी पर हंसिये से हमला किया गया। इस हमले के संबंध में तीन लोगों को गिरफ्तार किया गया है। पुलिस घटना की जांच कर रही है, जो मुफ्त लकड़ी को लेकर हुए विवाद से उपजी है।

Web Title : Crematorium worker attacked over free firewood; three arrested.

Web Summary : A crematorium worker in Pune was attacked with a sickle for providing free firewood for a funeral. Three individuals have been arrested in connection with the assault. Police are investigating the incident, which stemmed from a dispute over the free firewood.