शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

संध्या गायकवाड यांचे नगरसेवकपद अडचणीत

By admin | Updated: January 11, 2015 01:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या गायकवाड यांनी महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या गायकवाड यांनी महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच गायकवाड यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करून त्यावर चार महिन्यात सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक ६२ मध्ये इतर मागासवर्ग प्रवगार्साठी राखीव जागेवर निवडणूक लढविली होती. काँग्रेसतर्फे अ‍ॅड. पद्मीनीराजे मोहिते या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या. निवडणूक अर्ज भरतानाच अ‍ॅड. मोहिते यांनी गायकवाड यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदविला होता. परंतू त्याची दखल घेतली गेली नाही. गायकवाड यांनी जात प्रमाणपत्रासाठी सादर केलेली वंशावळ चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास आल्याने अ‍ॅड. मोहिते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर २४ एप्रिल २०१३ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गायकवाड यांच्या जात पडताळणी प्रमाणासंबंधी कायदेशीर प्रक्रिया करण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते.त्यानुसार जात पडताळणी समितीने गायकवाड यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत दक्षता पथकाचा अहवाल मागविला. गायकवाड यांच्याकडून कागदपत्रे मागवून तसेच वंशावळीबाबत नव्याने माहिती व प्रतिज्ञापत्र घेऊन अहवाल समितीला सादर केला. या प्रतिज्ञापत्रामध्ये नगरसेविका गायकवाड यांनी पूर्वी सादर केलेली वंशावळ चुकीची असल्याचे स्वत:च नमूद केले होते. (प्रतिनिधी)४सादर झालेल्या या अहवालावर समितीसमोर सुनावणी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजू ऐकुन घेऊन गायकवाड यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध ठरविण्यात आले. त्या निर्णयाविरूद्ध अ‍ॅड. मोहिते यांनी उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती ए. एस. ओक व न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे १८ डिसेंबर २०१४ रोजी सुनावणी झाली. त्या सुनावणीत खंडपीठाने गायकवाड यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविले. त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करावी. त्यावर सुनावणी घेऊन चार महिन्यात योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.