शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळू माफियांना दणका! ३ लाखांची वाळू उपसा बोट नष्ट, महसूल विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:07 IST

आरोपी फायबर बोट वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले होते

इंदापूर: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरडेवाडी गावच्या हद्दीत लोंढेवस्ती लगतच्या उजनी धरणाच्या  पाणलोट क्षेत्रात वाळू उपसा करणारी ३ लाखांची फायबर बोट नष्ट करुन, बोटीत असणारी १६ हजारांची दोन ब्रास वाळू नदीपात्रात बुडवून नाश करत तहसीलदार व महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांना ३ लाख १६ दणका दिला आहे. या प्रकरणी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिल्या उर्फ सौरभ वाघमारे (रा. सरडेवाडी ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. मंडल अधिकारी शाम झोडगे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तहसीलदार जीवन बनसोडे,नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, मंडल अधिकारी औदुंबर शिंदे, तलाठी अशोक पोळ, वैशाली कारंडे, कांता देशमुख, मनीषा पोळ,राजश्री ढमे, वैभव मुळे,भास्कर घोळवे, पोलीस कर्मचारी वैभव गरड, सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.

सरडेवाडी गावच्या हद्दीत लोंढेवस्ती येथे उजनी जलाशयाचे पाणलोट क्षेत्रात एक फायबर बोट वाळु या गौण खनिजाची चोरी करण्याचे उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवण्यात येत आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी महसूल विभागातील कर्मचा-यांना तशी कल्पना दिली. सर्वजण घटनास्थळी गेल्यानंतर आरोपी पिल्या उर्फ सौरभ वाघमारे हा त्याच्या साथीदारासह त्याच्या ताब्यातील फायबर बोट वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवत असल्याचे आढळले. महसूल विभागाच्या पथकाचा सुगावा लागल्यानंतर पिल्या व त्याचे साथीदार लगत असणा-या ऊसाच्या फडाचा फायदा घेवून तेथुन पळून गेले. महसूल विभागाच्या पथकाने ती बोट ताब्यात घेवून पडस्थळ व सुगावचे पोलीस पाटील, शिपाई यांच्या सहकार्याने नष्ट करुन तिच्यात असणारी दोन ब्रास वाळू उजनी जलाशयामध्ये बुडवुन नाश केली आहे. आरोपी पिल्या उर्फ सौरभ वाघमारे व त्याच्या साथीदारासह यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरsandवाळूCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाDamधरणriverनदी