Russia-Ukraine war | सहा दिवसांत ३ देश, ६ हजार किमी अंतर पार; मुलाला पाहताच आईला आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:14 PM2022-03-05T18:14:47+5:302022-03-05T18:23:28+5:30

पुणे जिल्ह्यातील पिंपळगावचा पियुष थोरात हा विद्यार्थी घरी परतला...

russia ukraine war staying in 3 countries for 6 days pune student finally reached home | Russia-Ukraine war | सहा दिवसांत ३ देश, ६ हजार किमी अंतर पार; मुलाला पाहताच आईला आनंदाश्रू

Russia-Ukraine war | सहा दिवसांत ३ देश, ६ हजार किमी अंतर पार; मुलाला पाहताच आईला आनंदाश्रू

googlenewsNext

केडगाव (पुणे): सध्या रशिया (russia) आणि युक्रेन (ukraine) यांच्यात युद्ध पेटले आहे. त्यामुळे तिथं शिकत असणारे भारतीय विद्यार्थी देशात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामधील बरेच विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. पण काही विद्यार्थी अजून तिथेच अडकले आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपळगावचा पियुष विकास थोरात हा विद्यार्थी घरी परतला आहे. आपला लाडका मुलगा घरी परतल्याच्या आनंदाने पियुषच्या आईला आनंदाचे अश्रू अनावर झाले. पियुष हा युक्रेनमधील (ukraine)  ओडीसा विद्यापीठात (Odesa National Medical University) मेडिकलचे शिक्षण घेत होता.

घरच्यांकडून 'जंगी' स्वागत-

पियुषने ३ वेगवेगळ्या देशांमध्ये ६ दिवस मुक्काम करत ६ हजार किलोमीटर अडथळ्यांचा प्रवास केला आहे. त्यानंतर तो पिंपळगाव (दौंड) येथे दाखल झाला. यावेळी कुटुंबियांच्या वतीने त्याचे रांगोळी, फुलांचा वर्षाव, औक्षण करत  स्वागत करण्यात आले. पियुषला पाहताच आई उषा थोरात यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी वडील विकास थोरात, चुलते मच्छिंद्र थोरात, सुरेखा थोरात, आत्या शोभा सोनवणे ,योजना कापरे, बहिण सुवर्णा विकास शेलार, रूपाली काटे यांनी स्वागत केले.

कसं केला प्रवास-

यावेळी युक्रेनमधील अनुभवाबाबत बोलताना पियुष म्हणाला की, २४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास खोलीमध्ये साखर झोपेत असताना जोरदार आवाज आला. माझ्यासोबत नोयडा, दिल्ली येथील तुषार पांडे, केरळ येथील शास्मित संतोष, जम्मू काश्मीर येथील अतिर दार व शाकीब खान आदी मित्र होते. त्यानंतर दोन वेळा बॉम्बचा आवाज आला. रस्त्यावरती जिथे तिथे मिलिटरी सैनिक दिसत होते. रणगाडे रस्त्यावरून फिरत होते.

एक दिवस बंकर मध्ये लपून बसलो. स्थानिक सरकारकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने त्यामुळे आम्ही १ दिवसानंतर युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. फ्लाइट बंद असल्याने पायी व बसच्या साहायाने १५० किमी प्रवास करत शेजारील देश माल्डोवामध्ये आलो. दोन दिवस भारताकडे येण्यासाठी फ्लाईटची वाट पाहत होतो. येथील सरकारने अनेक भारतीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या. जेवण दिले. विमानाची फ्लाईट मिळत नसल्याने नाईलाजाने माल्डोवामधून शेजारील रोमानिया देशामध्ये बसमध्ये प्रवास करत आल्याचे पिय़ुषने सांगतले.

रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे तेथील सरकारने जेवणाची राहण्याची सोय केली. शेवटी केंद्र सरकारच्या मदतीने फ्लाइट पकडून दिल्ली येथे रवाना झालो. यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित असल्याची माहिती पियुषने दिली.

Web Title: russia ukraine war staying in 3 countries for 6 days pune student finally reached home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.