कतरिना कैफ अन् विकी कौशल Quality Time! शूटिंगमधून वेळ काढत लंडनला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:42 PM2024-05-21T12:42:25+5:302024-05-21T12:46:09+5:30

कतरिना आणि विकी कौशल हातात हात घालून लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.

Katrina Kaif is also pregnant Baby bump seen walking in London with husband | कतरिना कैफ अन् विकी कौशल Quality Time! शूटिंगमधून वेळ काढत लंडनला रवाना

कतरिना कैफ अन् विकी कौशल Quality Time! शूटिंगमधून वेळ काढत लंडनला रवाना

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चाहत्यांचं लाडकं कपल. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. त्यांचे फोटो, व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या हे कपल लंडनमध्ये आहे. अनेक दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता तर तिचं बेबीबंपच दिसलं आहे. लंडनमध्ये त्यांचा फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात कतरिना ओव्हरकोटमध्ये दिसत असून तिचं बेबीबंप दिसून येतंय.

विकी आणि कतरिना व्हायरल व्हिडिओमध्ये हातात हात घालून फिरताना दिसत आहे. लंडनच्या रस्त्यांवर ते फेरफटका मारत आहेत. व्हाईट ड्रेस, काळा ओव्हरकोट आणि काळी पँट असं आऊटफिट तिने परिधान केलं आहे. तर विकी तिच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसतोय. काही सेकंदाच्या या व्हिडिओतून कतरिना प्रेग्नंट असल्याचं स्पष्ट दिसतंय. अद्याप याबाबत दोघांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही. हा व्हिडिओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी 'ती नक्कीच प्रेग्नंट आहे' अशा कमेंट्स केल्यात. तर काही जणांनी त्यांना प्रायव्हसी ज्या असं मत व्यक्त केलंय. सोशल मीडियावर कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी कतरिनाचा एका चाहत्यासोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. त्यात मात्र बेबीबंप दिसला नव्हता. 

सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये ती पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. कालच मतदानानिमित्त दीपिका आणि रणवीर सिंह यांची झलक दिसली. यावेळी दीपिकाचा पहिल्यांदा बेबीबंप स्पष्ट दिसत होता. आता विकी आणि कतरिना गुडन्यूज कधी ऑफिशियल करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

विकी कौशल आगामी 'छावा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत आहे. शिवाय संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमातही त्याची वर्णी लागली आहे.

Web Title: Katrina Kaif is also pregnant Baby bump seen walking in London with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.