शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

तांदळीत तीन पत्ती जुगारअड्ड्यावर छापा

By admin | Updated: August 13, 2015 04:33 IST

शिरूर तालुक्यातील तांदळी येथील खोरेवस्तीवर तीन पानी जुगारअड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी बारामती विशेष पथक विभागाने छापा टाकला. आलिशान गाड्या, रोख रकमेसह

मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील तांदळी येथील खोरेवस्तीवर तीन पानी जुगारअड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी बारामती विशेष पथक विभागाने छापा टाकला. आलिशान गाड्या, रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, फक्त एकास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, बाकीचे जुगारी पसार झाले.अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. घोडनदीजवळ कुबाभळीच्या झुडपात एका पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार सुरू होता. बंडू शेलार (मांडवगण फराटा ) व पंडित खोरे (तांदळी) हे दोघे भागीदारीत अड्डा चालवत होते. या ठिकाणी पोलिसांना १४ जण जुगार खेळताना आढळले.पोलिसांची चाहूल लागताच ते व जुगार चालवणारे उसाच्या शेतात पसार झाले. पोलिसांनी पाठलाग केला. यातील सुजित रमेश सारसकर (वय-४०, रा.सिद्धार्थनगर ,अहमदनगर) याला पकडण्यात यश आले. याबाबत विशेष पथकातील हेडकॉन्स्टेबल संजय कोलते यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमध्ये आलिशान गाड्यांसह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. ६५लाख ६७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. छाप्याच्यावेळी या आलिशान गाड्यांमध्ये लाखोंची रोख रक्कम आढळून आली आहे. यामध्ये टाटा सफारी, स्विप्ट, डस्टर, टोयाटो अशा आलिशान गाड्या आहेत.कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या विशेष पथकातील संजय कोलते , एस.डी भोई, पी.आर.टापसे, जी.बी.पाटील, एम .एन .गायकवाड, जे.एस.शेळके, एस.जी औटी, व्ही.पी.मोरे, ए.जे.चव्हाण, जमादार ए.के. रासकर यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)