शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नदीचे पाणी शेतीला नव्हे; पुन्हा नदीतच

By admin | Updated: October 3, 2015 01:51 IST

शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा

पुणे : शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बंद करण्याची नामुष्की उद्भवली आहे. पाटबंधारे विभागाकडून हे पाणी सोडले जाणाऱ्या बेबी कालव्याचे कामच ुअपूर्ण असल्याने दुसऱ्याच दिवशी हा प्रकल्प बंद केला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीही सोडलेले पाणी शेतीला नव्हे तर चक्क पुन्हा नदीलाच सोडण्यात आले आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा लागणार आहे. सन २००५-०६पर्यंत शहराचा विस्तार मर्यादित असल्याने पालिकेस खडकवासला प्रकल्पातील केवळ १० ते ११ टीएमसी पाण्याची गरज भासत होती. त्यामुळे २०११पर्यंत पालिकेला पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी ११.५० टीएमसी पाणी दिले जात होते. त्यानंतर पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅकवेल उभारला जात आहे. हे पाणी या बंधाऱ्यातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटरच्या वाहिनीद्वारे हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाणार आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी उद्घाटनही झाले. मात्र, हे पाणी वाहून घेऊन जाणाऱ्या कालव्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने हे पाणी शेतीसाठी पोहोचणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जॅकवेलची तपासणी करण्यासाठी अवघा अर्धातास कालव्यात पाणी सोडून प्रकल्प बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तर पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानंतरच पाणी सोडण्यापुरतीच महापालिकेची भूमिका असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.