आर्थिक साेर्ससाठी कृषी महाविद्यालयाच्या भाेजनगृहाचा व्यवस्थापक; काम करताना चैतन्यचा विजेचा शॉक लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:54 IST2026-03-26T09:53:41+5:302026-03-26T09:54:17+5:30

महाविद्यालयाच्या मेसमध्ये अर्धवेळ काम करून कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्या ‘चैतन्य’चा हा आकस्मिक मृत्यू नव्हे, तर व्यवस्थेनेच त्याचा खून केला

Restaurant manager for financial reasons; Chaitanya dies of electric shock while working | आर्थिक साेर्ससाठी कृषी महाविद्यालयाच्या भाेजनगृहाचा व्यवस्थापक; काम करताना चैतन्यचा विजेचा शॉक लागून मृत्यू

आर्थिक साेर्ससाठी कृषी महाविद्यालयाच्या भाेजनगृहाचा व्यवस्थापक; काम करताना चैतन्यचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पुणे : शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील भाेजनालय... शनिवार, दि. १४ मार्चची रात्र... सर्व विद्यार्थी जेवणासाठी भाेजनालयात जमलेले. तांत्रिक बिघाडामुळे मुलांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध हाेत नव्हते, तेव्हा तेथे व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ काम करणारा चैतन्य चव्हाण वाॅटर कुलरची पीन व्यवस्थित करण्यासाठी पुढे आला आणि विजेचा शाॅक लागला. इथेच त्याचा घात झाला आणि विजेचा धक्का लागून ताे थेट काेमात गेला. गेले दहा दिवस मृत्यूशी झुंजणाऱ्या चैतन्यची धडपड अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्याेत मालवली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक हाेत महाविद्यालयात आंदाेलन केले. कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये अर्धवेळ काम करून कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्या ‘चैतन्य’चा हा आकस्मिक मृत्यू नव्हे, तर व्यवस्थेनेच त्याचा खून केला, अशी तीव्र भावना व्यक्त केली.

दरम्यान, महाविद्यालयातील कर्मचारी, चैतन्यचे मित्र, सहकारी आणि सर्व विद्यार्थी उपचाराचा खर्च उचलण्यासाठी आर्थिक मदतीची जुळवाजुळव करत हाेते. पण, दुर्दैवाने चैतन्यचा मृत्यू झाला आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचाही बांध फुटला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत बुधवारी (दि. २५) सकाळी महाविद्यालयाच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदाेलन सुरू केले. दाेषींवर कारवाई हाेत नाही, ताेपर्यंत हटणार नाही, असा निश्चय केला. कुलगुरूंनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि सदर दुर्घटनेची तातडीने चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी, अशी आग्रही भूमिका मांडली.

काेण हाेता चैतन्य?

चैतन्य चव्हाण हा मूळचा बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील डोंगरगाव येथील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. कृषी महाविद्यालय, पुणे येथील २०२१-२५चा माजी विद्यार्थी आहे. मुळातच हुशार. स्वत:च्या पायावर उभा राहून कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे स्वप्न उरी बाळगून पुण्यात आलेला तरुण. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्याला पुण्यातील नामांकित कृषी महाविद्यालयात बीएसस्सी ॲग्रीकरिता प्रवेश मिळाला आणि स्वप्नांना पंख मिळाले. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत हाेता. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथेच कृषी व्यवसाय व्यवस्थापन (Agriculture Business Management) या विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला. घरची स्थिती बेताची असल्याने स्वत:लाच आर्थिक साेर्स तयार करणे आवश्यक हाेते. पुण्यात राहण्या - खाण्याची साेय व्हावी, शिक्षणाला हातभार लागावा म्हणून सहकार तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या भाेजनगृहाचा व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ काम करण्याचा निर्णय घेतला. येथेच काम करत असताना १४ मार्च राेजी सायंकाळी विजेचा शाॅक लागून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. अवघा २३ वर्षीय चैतन्य कुंडलिक चव्हाण सर्वांना अर्ध्यावर साेडून गेल्याने मित्रांसह कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

 

Web Title : कृषि महाविद्यालय के भोजनालय प्रबंधक की बिजली के झटके से मौत; शोक

Web Summary : कृषि महाविद्यालय के भोजनालय में काम करने वाले चैतन्य चव्हाण की पानी के कूलर को ठीक करते समय बिजली के झटके से मौत हो गई। छात्रों ने लापरवाही का आरोप लगाते हुए विरोध प्रदर्शन किया। 23 वर्षीय युवक अपनी शिक्षा और परिवार का समर्थन कर रहा था। जांच की मांग की गई है।

Web Title : Agricultural College Canteen Manager Dies of Electric Shock; Tragedy Strikes

Web Summary : Chaitanya Chavan, working at an agricultural college canteen, died from an electric shock while fixing a water cooler. Students protested, alleging negligence. The 23-year-old supported his education and family. Investigations are demanded.