शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळणाला दुसऱ्या दिवशीही विरोध

By admin | Updated: August 28, 2015 04:32 IST

‘एकच ध्यास नो बायपास’ अशी घोषणा देत नारायणगाव बाह्यवळण रस्ता मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्र्शविला. पुणे-नाशिक महामार्गावर त्यांनी

नारायणगाव : ‘एकच ध्यास नो बायपास’ अशी घोषणा देत नारायणगाव बाह्यवळण रस्ता मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्र्शविला. पुणे-नाशिक महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास आंदोलन करणाऱ्या ५० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सायंकाळी सोडून देण्यात आले. चुकीच्या पद्धतीने बाह्यवळण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असा इशारा आंदोलकांनी या वेळी दिला. या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही दुतर्फा पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी झाली होती़ आज दिवसभर नारायणगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त होता़ आज सकाळी दहाच्या सुमारास नारायणवाडी ते वारूळवाडी हद्दीतील कोठारी व्हील्ससमोरील महामार्गापर्यंत अंतिम मोजणी करण्यात आली़ दरम्यान, वारूळवाडी येथील संतोष निंबाळकर या बाधित शेतकऱ्याने मोजणीस विरोध केला. प्रशासनाने कोणतीही मोजणीची नोटीस दिलेली नाही व त्यांचा सर्व्हे नंबर मोजणीच्या नोटीसमध्ये चुकीचा असल्याने त्यांनी मोजणी करू दिली नाही़ आज सकाळी बाधित शेतकऱ्यांची पुन्हा बैठक झाली. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न मांडल्यानंतर जनरल मॅनेजर खोडसकर यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत सांगितले, की बाह्यवळण रद्द करणे हे आमच्या अधिकारात नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अथवा न्यायालयात दाद मागावी. मात्र बाह्यवळण हे होणारच असे सांगितले. लहान पूल, कालवा पूल, सेवा रस्ता व मुख्य रस्ता या संदर्भातील काही बदल हे तांत्रिक सल्लागार यांच्याशी चर्चा करून केले जातील़ आज सकाळी शेतकऱ्यांनी नारायणगाव बस स्थानकासमोर पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केले. त्यानंतर आशा बुचके म्हणाल्या, की नारायणगावातून बाह्यवळण होत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे़ शिवसेना बाह्यवळण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे म्हणाले, शेतकऱ्यांना कमजोर समजू नका़ आम्ही कोणाचीही मदत न घेता सनदशीर मार्गाने जाणार आहोत़ (वार्ताहर)