शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण, झोनिंग झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

मार्गासनी : स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे पीएमआरडीएचे आरक्षण व झोनिंग झाले पाहिजे. तसे होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरु ...

मार्गासनी : स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे पीएमआरडीएचे आरक्षण व झोनिंग झाले पाहिजे. तसे होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरु राहणार असल्याचे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांनी सांगितले.

पीएमआरडीएच्या केलेला चुकीचा सर्व्हे आणि झोनिंग विरोधात जनजागृती मोहीम आणि बाधितांच्या मदतीसाठी भाजपच्या वतीने जनजागृती आणि हरकती घेण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात विंझर येथील अमृतेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात येथील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रदेश युवा मोर्चा सचिव जितेंद्र बोत्रे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील जागडे, युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा सुषमा जागडे, कार्याध्यक्ष देविदास आमदार सरचिटणीस दिनकर मळेकर, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अक्षय नलावडे, सरपंच विनायक लिम्हण, उपसरपंच राहुल सागर, सुजाता कडू, माजी अध्यक्ष रवींद्र दसवडकर, युवा मोर्चा सरचिटणीस सुनील धिंडले, ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊ मरगळे, प्रसन्ना पोरे, दत्तात्रय निढाळकर, रोहिदास करंजकर, लक्ष्मण शिर्के, अनिल कडू,अनंता आधवडे, लक्ष्मण सागर, पंढरीनाथ जगताप, विक्रम सोनवणे, रामदास भोसले, विष्णू दीक्षित, अमोल गायकवाड, प्रसाद शिळीमकर, मनोज कातुर्डे, समीर आधावडे उपस्थित होते.

बाळासाहेब भेगडे म्हणाले, तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हरकतींसाठी अर्ज भरून घ्यावेत, अशा सूचना दिल्या.

सुनील जागडे म्हणाले की, आर्किटेक्ट आणि इंजिनिअर आणि वकील यांच्याशी तांत्रिक बाबींवर चर्चा करुन वेल्हे तालुक्यातील धरणभागातील सीमेलगत असलेल्या लवासा सिटीमधील गावांना गिरीस्थान झोन मिळालेला आहे. त्याच धर्तीवर वेल्हे तालुक्याच्या संपूर्ण पश्चिमेकडील धरण भागात गिरीस्थान झोन द्यावा, आणि पूर्व भागामध्ये गावठाण लगत आणि रस्त्यालगतचे शेती यांना रहिवासी, व्यावसायिक झोन द्यावा. रस्त्यांसाठी होणारे आरक्षण हे घरे, मंदिरे, शाळा, दवाखाने इत्यादी बांधकामांना बाधा येणार नाहीत अशा पद्धतीने द्यावीत. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने पीएमआरडीए झोनिंग करावे. अन्यथा, आम्ही टोकाचा लढा देऊन याबाबत जनतेला न्याय हक्क मिळवून देऊ, अशी भूमिका मांडली.

०१ मार्गासनी

नकाशातील झोनिंग दाखवताना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व इतर.