शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये रजिस्टर मॅरेजचा ‘टे्रंड’

By admin | Updated: May 12, 2015 04:16 IST

लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये

नम्रता फडणीस / हिनाकौसर खान-पिंजार , पुणे‘लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये पहायला मिळत होती. यासाठी लग्नावर वारेमाप पैशाची उधळण करण्याबद्दल देखील त्यांच्या मनात ’किंतु’ असत नव्हता. आता मात्र जग बदलते आहे! एकविसाव्या युगाकडे वाटचाल करताना तरूणाईच्या विचारसरणीत कमालीचे बदल होत आहेत. विवाहपद्धतीवर विश्वास नसण्यापासून ते सध्याच्या महागाईच्या काळात लग्नाचा थाट-माट, पाहुणे मंडळींचा राबता, त्यांचे मान-पान, जेवळावळीपर्यंतचा खर्च टाळण्यासाठी झगमगत्या विवाहसोहळ्याला बगल देत नोंदणीपद्धतीने (रजिस्टर)लग्न करण्याचा ’ट्रेंड’ हळूहळू समाजात प्रस्थापित होऊ लागला आहे. मागील चार महिन्यांची आकडेवारी पाहता यापद्धतीने दिवसाला सरासरी १२-१५ ते लग्न होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पण चित्र निश्चितचं आशादायी नाही आहे का! ‘लग्न’हा मुख्यत्वे नवरा अन नवरी च्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. प्रत्येक युवापिढीने आपल्या लग्नाचे सुंदर स्वप्न पाहिलेले असते. मात्र आपल्याच स्वप्नाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याचा नवा विचार त्यांच्यामध्ये रूजत चालला आहे. लग्न, लग्नाचा पेहराव, खानपान, मानपान, नजीकच्या आप्तेष्टांसाठी विविध गिफ्टस घेणे यावर वारेमाप खर्च होतो. शिवाय पूर्वीप्रमाणे आता लग्न समारंभ हा नवरीच्या घरी किंवा अंगणात होत नाहीत. लग्नासाठी मोठमोठे हॉल्स किंवा लॉन्सच घेणे भाग पडते. यातच ‘‘लग्न’ वधूकडच्या मंडळींनी करून देण्याची प्रथा चालत आली आहे, वडिलाधाऱ्यांचा आयुष्यभराचा पैसा खर्ची जातो तर काही वेळा कर्ज ही काढावे लागतात. त्यामुळे उच्च शिक्षित मुलींना हीच प्रथाच मान्य नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठीच नोंदणीपद्धतीने लग्न करून वायफळ खर्चाला आळा घालण्याकडे तरूणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसत आहे.