शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 17:19 IST

वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांना सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा..!

बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त मंगळवारी (दि. २२) बारामतीत एकाच मंचावर शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत, तर युगेंद्र पवार खजिनदार आणि सुनेत्रा पवार विश्वस्त आहेत. या बैठकीच्या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सुनेत्रा पवारांकडून युगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

युगेंद्र पवार यांचा वाढदिवस असल्याने, सुनेत्रा पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले आणि काकींचा आशीर्वाद घेतला. यावेळी इतर विश्वस्तांनीही पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीदरम्यान दोघेही शेजारी बसले होते आणि त्यांच्यात संवादही झाला.

पवार कुटुंबातील ‘संवाद’ वाढतोय का?

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबातील संबंधांमध्ये सौहार्द निर्माण होत असल्याचं स्पष्ट होत आहे. जय पवार यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात नुकतीच एक बंद दाराआड बैठकही पार पडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ‘पवारांची पुन्हा एकजूट’ या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.

“जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं” – शरद पवार

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना पत्रकारांनी थेट विचारणा केली की, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येतंय का? यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. तुम्ही जो उसाच्या उत्पादन वाढीचा प्रश्न उपस्थित केला, त्यावर आम्ही वर्षभर काम करतोय. यासाठी सरकारमध्ये चर्चा करणं गैर नाही.”

त्यांच्या या विधानामुळे ही राजकीय जवळीक तात्पुरती आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने गणित मांडली जात आहेत, यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

राजकीय फेरजुळणीचे संकेत?

पवार कुटुंबातील संवाद, सार्वजनिक एकत्रित उपस्थिती आणि शरद पवार यांची ‘सरकारशी बोलणे गैर नाही’ ही भूमिका, हे सगळं आगामी काळात राज्यातील राजकारणात मोठे बदल घडवू शकते. पवारांच्या ‘राजकीय घराण्याचा’ हा नवीन अध्याय कुठल्या दिशा दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारyugendra pawarयुगेंद्र पवार