शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग दुकानदारांचा आज बंद

By admin | Updated: October 13, 2015 00:37 IST

रेशन दुकानदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी १२ आॅक्टोबरला रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़

पुणे : रेशन दुकानदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी १२ आॅक्टोबरला रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ जिल्ह्यात पोलीस व पुरवठा विभागाच्या वतीने सध्या सुरू असेलली स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी योग्य आहे, पण दुकानदारांना होणारा त्रास त्वरित थांबवा. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार शासनाने धान्य दुकानदारांना त्याच्या दुकानापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. परंतु पुणे जिल्ह्यात गोदामामधून दुकानदारांनाच धान्य उचलावे लागते. तसेच गॅस सिलिंडरधारकांना शासनाने रॉकेलचा पुरवठा बंद केला आहे. पण अद्यापही अनेक रेशनकार्डवर गॅस सिलिंडर धारक असल्याच्या नोंदी नाहीत. त्यामुळे नक्की कोणत्या लाभार्थ्यांना रॉकेल द्यावे व नाही, असा गोंधळ दुकानदारांचा उडाला आहे. वेळोवेळी तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशनच्या वतीने धान्य वाटप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरदेखील मागण्यांचा विचार न केल्यास नोव्हेंबर महिन्याचे धान्य, साखर, डी.डी काढून सर्व दुकानदार शिवाजीनगर येथील गोदाम येथे जमा करतील. त्यानंतर हे धान्य वाटप करण्याची जबाबदारी प्रशासन व शासनाची राहील, असा इशारा देखील फेडरेशनने दिला. (प्रतिनिधी)