लग्नाच्या बहाण्याने बलात्कार अन् १४ लाखांचे कर्ज घेत फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:33 PM2022-08-09T15:33:02+5:302022-08-09T15:35:02+5:30

तब्बल १४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर...

Rape on the pretext of marriage and fraud by taking a loan of 14 lakhs | लग्नाच्या बहाण्याने बलात्कार अन् १४ लाखांचे कर्ज घेत फसवणूक

लग्नाच्या बहाण्याने बलात्कार अन् १४ लाखांचे कर्ज घेत फसवणूक

Next

पुणे : शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचा बहाणा करून तरुणीला लॉजवर नेत बलात्कार केला. तसेच तिचा ईमेल आयडी घेऊन त्यावर तब्बल १४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोहगाव येथील एका २९ वर्षांच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शांतनू गंगाधर महाजन (वय २८, रा. रिव्हरडेल सोसायटी, खराडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विमाननगरमधील लेमन ट्री हॉटेल, हिंदुस्थान हॉटेल येथे २९ जून ते आतापर्यंत घडला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांनी लग्नासाठी आपले नाव शादी डॉट कॉमवर रजिस्टर केले होते. त्यावरून तिची शांतनू महाजन याच्याबरोबर ओळख झाली. त्याने लग्नाची मागणी करून तिला भेटायला बोलावले. तिला हॉटेलवर घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

यावेळी तिची नजर चुकवून फिर्यादीचा मोबाईल घेऊन फिर्यादीचा मेल आयडी त्याच्या मोबाईल फोनमध्ये ॲड करून फिर्यादीच्या नावाने १४ लाख रुपये कर्ज घेतले. कर्जाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा करून घेतली. हा प्रकार समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.

Web Title: Rape on the pretext of marriage and fraud by taking a loan of 14 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.