शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगप्रकरणी विद्यार्थ्यांसह प्राचार्यांवरही दोषारोपपत्र

By admin | Updated: September 6, 2015 03:35 IST

सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळवणूकप्रकरणी विद्यार्थ्याने तक्रारी करूनही त्याची दखल न घेतल्याने प्राचार्यांविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर तीन विद्यार्थ्यांवरही अ‍ॅँटीरॅगिंग

पुणे : सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळवणूकप्रकरणी विद्यार्थ्याने तक्रारी करूनही त्याची दखल न घेतल्याने प्राचार्यांविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर तीन विद्यार्थ्यांवरही अ‍ॅँटीरॅगिंग कलमाअंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एमआयटी कॉलेज आॅफ पॉलीमर विभागाच्या परिसरात जुलै ते सप्टेंबर २०१४ दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी प्राचार्य ललितकुमार क्षीरसागर यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन रॅगिंग अ‍ॅक्ट कलम ७ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यश मिलन नाईक (वय १९, रा. शनिवार पेठ), निखिल भास्कर श्रीमल(वय २१, रा. धनकवडी) आणि तेजस सतीश मिरजकर (वय २१, रा. कोथरुड) यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन रॅगिंग अ‍ॅक्टप्रमाणे कलम ४ आणि ३४२, ३५५, ५०६, ३४ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पॉलीमर विभागातील एका विद्यार्थ्यास वरील तीन विद्यार्थी सातत्याने त्रास देत होते. प्रयोगशाळेत रसायन टाकून त्याची दुर्गंधी घेण्यास लावणे, बाथरुमध्ये कोंडून ठेवणे, थुंकी चाटायला लावणे, पॅँट खाली ओढून कपडे कात्रीने फाडण्याची धमकी देणे अशा पद्धतीने त्याचा छळ केला जात होता. याबाबत संबंधित विद्यार्थ्याच्या आईने तक्रार दिली होती. मात्र, क्षीरसागर यांनी त्याची दखल घेतली नाही. संबंधित मुलाच्या पालकांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.