शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

धरण क्षेत्रात मुसळधार

By admin | Updated: July 18, 2014 03:21 IST

अनेक दिवस पुणेकरांवर रूसलेल्या वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवायला सुरुवात केली

पुणे : अनेक दिवस पुणेकरांवर रूसलेल्या वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवायला सुरुवात केली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पाणीकपातीच्या संकटात शहरवासीयांना सुखद दिलासा मिळाला आहे. पावसाने अशीच कृपादृष्टी ठेवावी, अशी आशा सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये गेल्या ३६ तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल ४०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने तळ गाठलेल्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली असून, हा साठा २़४७ टीएमसीवर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत या पाणीसाठ्यात जवळपास १ टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे. गेला महिनाभर दडी मारलेल्या पावसाने मागील आठवडाभरापासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगले पुनरागमन केले आहे. गेल्या ३६ तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १९६ टीएमसी, वरसगाव धरणात ९९ मिलिमीटर, पानशेत धरणात १०२ मिलिमीटर, तर खडकवासला धरणात सुमारे २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसाने या चारही धरणांची पाणीपातळी चांगली वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येत्या ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.