शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

ॲम्बुलन्स, स्कूल बस अग्निशमन दलाची गाडीही अडकली;रस्ता अडवून इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का?

By किरण शिंदे | Updated: December 13, 2025 20:11 IST

संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती.

पुणे - पुण्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची संख्या प्रचंड त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. मात्र शुक्रवारी पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे ३ तास वाहतूक ठप्प झाली होती. काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आलं, आणि यासाठी वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम असा झाला की, या संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती.पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या वाहतूक कोंडी संदर्भातले कॉल केले. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झाले काळेपडळ वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव. वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आधीच त्यांचा पारा चढला होता. आणि त्याला कारणीभूत समोर कीर्तनाचा कार्यक्रम असल्याचं लक्षात येताच त्यांनी आयोजकांना धारेवर धरलं. कुणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला. इतकंच नाही तर कीर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनाही त्यांनी महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनी काही काळासाठी कीर्तन थांबवलं. आणि त्यानंतर पोलीस अधिकारी प्रवीण जाधव यांनी हातात माईक घेत वाहतुकीची कोंडी कशी झाली हे उपस्थित लोकांना पटवून दिलं. आणि रस्ता रिकामा करण्यासाठी सांगितलं. तोपर्यंत आयोजक त्या ठिकाणी आले. पोलीस आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.काळेपडळ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी असलेले प्रवीण जाधव यांनी सांगितले की,आयोजकांनी वाहतूक विभागाची अथवा स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्यक्रमाविषयी कोणालाही कल्पना नव्हती. श्रीराम चौकातील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे सायंकाळी ५:३० ते रात्री ९ पर्यंत या संपूर्ण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या परिसरातील रस्ते जाम झाल्याचे मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. कार्यक्रम आठ वाजता संपल्यानंतर साडेनऊ पर्यंत वाहतुकीची कोणी तशीच होती. परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं पत्र मी काळेपडळ पोलिसांना लिहिल्याचे जाधव यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Indurikar Maharaj's event blocks Pune road; ambulances, buses stuck.

Web Summary : Indurikar Maharaj's unauthorized kirtan in Pune caused a massive traffic jam. Ambulances and school buses were stuck for three hours. Police halted the event and are considering filing charges against the organizers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी