शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

धरण कोरडे, विहिरी आटल्या; भोर तालुक्यात पाणी संकट गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:27 IST

- चार गावांना टँकरद्वारे आजपासून सुरू झाला पाणीपुरवठा - उन्हाळ्याची झळ वाढताच नऊ गावांची मागणी; उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

भोर : तालुक्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असून, ७ गावे व एका वाडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्यापैकी चार गावांना लोकसंख्येनुसार भोर पंचायत समितीकडून आजपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने भोर तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाई गंभीर बनली आहे. महामार्गालगत असलेल्या शिंदेवाडी, ससेवाडी, साळवडे आणि करंदी खेबा या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मान्यता देत संबंधित गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, रायरी परिसरातील धाराबेवाडी, परहर, वारवंड, शिळीम, शिरवली आणि हिमाची माळवाडी या गावांनीही टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले असून, ते तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

करंदी खेबा येथील विहिरीत पाणी कमी पडत असल्याने पुरंदर तालुक्याच्या हद्दीतून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना होती. मात्र, ही पाइपलाइन वनविभागाच्या हद्दीतून जाणार असल्यामुळे अद्याप परवानगी मिळालेली नाही आणि त्यामुळे हे काम रखडले आहे. तसेच भोर-महाड मार्गावरील नीरा-देवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील विहीर कोरडी पडली आहे. परिणामी वारवंड गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तेथे टँकरची मागणी करण्यात आली आहे. सध्या काही गावांमध्ये ग्रामस्थांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

याशिवाय, ‘जलजीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. निधीअभावी काही कामे रखडली असून, अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी वनविभागाच्या अडचणींमुळे योजना बंद आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे.

भोर पंचायत समितीकडे एकूण नऊ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी चार गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित गावांनाही लवकरच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सभापती मनीषा कंक आणि उपसभापती विशाल कोंडे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Severe Water Crisis Grips Bhor Taluka; Wells Run Dry

Web Summary : Bhor Taluka faces acute water scarcity due to rising temperatures. Tankers supply water to four villages. More villages request water tankers as water sources dry up. Incomplete water schemes worsen the crisis.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेWaterपाणीwater shortageपाणी कपातMaharashtraमहाराष्ट्र