Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:00 IST2025-11-23T15:56:27+5:302025-11-23T16:00:56+5:30
Pune Viral Video: पुण्यातील नारायण पेठेत एका तरुणाने अनेक वाहनांना उडवले. त्यानंतर मी पोलिसाचा मुलगा असल्याचे सांगत धिंगाणा घातला.

Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
Pune Crime Video: शनिवारी मध्यरात्री पुण्यातील नारायण पेठेत एका तरुणाने गोंधळ घातला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने आधी कार चालवत असताना अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्याला कारमधून बाहेर काढले, त्यावेळी त्याने हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा आहे म्हणत धिंगाणा घातला.
पुण्यातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत कारमधून जात होता. त्याच्यासोबत एक तरुणीही होती. कार चालवत असलेल्या तरुणाने अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी त्याला कारमधून बाहेर काढले.
कारमधून काढल्यानंतर तरुणाने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. धक्का लावायचा नाही. मी पोलिसांचा मुलगा आहे, म्हणत त्याने लोकांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिथेच बराच गोंधळ निर्माण झाला. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तरुणी म्हणाली तो माझा भाऊ
तरुणी या तरुणाला सांभाळताना दिसत आहे. धिंगाणा घालणारा तरुण भाऊ असल्याचे तरुणी बोलताना दिसत आहे. तरुण म्हणत आहे की मला दारू पिऊ द्या. मी पोलिसाचा मुलगा आहे.
‘Don’t Touch Me, I’m a Policeman’s Son’: Pune Youths Create Chaos in Narayan Peth, Hit Disabled Man @CPPuneCity@PuneCityPolicehttps://t.co/4lNMGsMRNvpic.twitter.com/HRdqvrOlz2
— Punekar News (@punekarnews) November 23, 2025
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कारमध्ये चौघेजण होते. दोन तरुण आणि दोन तरुणी होत्या. चौघेही दारू प्यायलेले होते. तरुणाने कार चालवताना अपंग व्यक्तीला धडक दिल्याचेही म्हटले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर मध्यस्थी करत पोलिसांनी दोन्हीकडच्या लोकांना शांत केली. दोन्हीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारी पोलिसांनी घेतल्या असून, तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.