Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:02 IST2026-01-12T13:02:39+5:302026-01-12T13:02:39+5:30

Makar Sankrant 2026 Importance: १३,१४,१५ जानेवारी हे तिन्ही दिवस का महत्त्वाचे आणि ते कसे साजरे करायचे? त्याचे पौराणिक आणि वैद्यकीय महत्त्व जाणून घेऊ. 

Makar Sankrant 2026: Do you celebrate Sankranti, but do you know why the day before and after are important? | Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?

Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?

मकर संक्रांत हा केवळ एका दिवसाचा सण नसून, तो सलग तीन दिवस चालणारा लोकप्रिय उत्सव आहे. या तीन दिवसांत निसर्ग, आरोग्य आणि समाज अशा तिन्ही पातळ्यांवर बदल घडत असतात. काय आहे या तीनही दिवसांचे महत्त्व? चला जाणून घेऊ. 

मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?

महारष्ट्रात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? संक्रांतीच्या आदला दिवस 'भोगी' आणि नंतरचा दिवस 'किंक्रांत' या दोन्ही दिवसांना तितकेच धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व आहे. या तीन दिवसांच्या त्रिवेणी संगमातूनच हा सण पूर्ण होतो.

१. संक्रांतीचा आदला दिवस: 'भोगी' (निसर्गाप्रती कृतज्ञता)

संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' म्हणतात. भोगी म्हणजे 'आनंद उपभोगणे'.

महत्त्व: हिवाळ्यातील ताज्या भाज्यांचा आस्वाद घेण्याचा हा दिवस. या दिवशी 'खेंगट' (मिश्र भाजी) आणि तिळाची बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा आहे.

शास्त्रीय कारण: थंडीच्या दिवसात शरीराला उष्णतेची गरज असते, ती बाजरी आणि तिळातून मिळते. तसेच, नवीन पिकांबद्दल निसर्गाचे आभार मानण्याचा हा दिवस असतो.

२. मुख्य दिवस: मकर संक्रांत (संक्रमणाचा काळ)

जेव्हा सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकर संक्रांत.

महत्त्व: या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. प्रकाशाचा अंधारावर विजय म्हणून हा दिवस साजरा होतो.

परंपरा: 'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत जुन्या कटू आठवणी विसरून नवीन नाती जोडली जातात. या दिवशी सुवासिनी एकमेकींना 'वाण' लुटतात आणि दानधर्माला मोठे महत्त्व दिले जाते.

Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 

३. संक्रांतीचा नंतरचा दिवस: 'किंक्रांत' किंवा 'करी'

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला 'किंक्रांत' किंवा 'करी' असे म्हणतात. अनेकजण याला नकारात्मक मानतात, पण त्यामागे एक शौर्यगाथा आहे.

पौराणिक संदर्भ: संक्रांती देवीने 'संक्रासुर' राक्षसाचा वध केला, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी 'किंकर' नावाच्या दैत्याचा नाश केला. म्हणूनच या दिवसाला 'किंक्रांत' म्हटले जाते. हा दिवस शत्रूवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे.

सावधगिरीचा दिवस: लोकमान्यतेनुसार, हा दिवस काही शुभ कार्यांसाठी टाळला जातो, कारण देवीने या दिवशी भीषण युद्ध केले होते. या दिवशीही गोड जेवण करून सणाची सांगता करण्याची पद्धत आहे.

Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा

या तीन दिवसांचा संदेश: मकर संक्रांतीचा हा तीन दिवसांचा काळ आपल्याला शिकवतो की-

भोगी: निसर्गाचा आस्वाद घ्या.

संक्रांत: नात्यात गोडवा आणा.

किंक्रांत: संकटांवर (राक्षसांवर) विजय मिळवा.

Web Title : मकर संक्रांति: भोगी, संक्रांति और किंक्रांत का महत्व जानिए।

Web Summary : मकर संक्रांति तीन दिनों का त्योहार है। भोगी प्रकृति की समृद्धि का जश्न मनाता है, संक्रांति सूर्य की उत्तरी यात्रा को चिह्नित करता है और रिश्तों में मिठास लाता है, और किंक्रांत प्रतिकूल परिस्थितियों पर विजय का प्रतीक है।

Web Title : Makar Sankranti: Significance of Bhogi, Sankrant, and Kinkrant explained.

Web Summary : Makar Sankranti is a three-day festival. Bhogi celebrates nature's bounty, Sankrant marks the sun's northward journey fostering sweetness in relationships, and Kinkrant symbolizes victory over adversity, completing the festive trifecta.