शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पुणे - सोलापूर रस्त्यावर दिवसेंदिवस होतीये वाहतूककोंडी; वाहनचालकांचा मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 3:14 PM

वळणांवर थांबणारी वाहने, अरुंद रस्ते अन बीआरटीचे अवशेष वाहतूक कोंडीस ठरतात कारणीभूत

प्रसाद कानडे 

पुणे: पुणे - सोलापूर रस्त्यावर दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडीमुळे गतिमान पुण्याला ब्रेक लागत आहे. हडपसर व 15 नंबर चौकात जर वाहतूक कोंडी झाली तर सोलापूर हुन येणाऱ्या वाहनांना मांजरी पासूनच ब्रेक लावत पुण्यात प्रवेश करावा लागतो. काही ठिकाणी रस्ते मोठे तर काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यात सिग्नलहुन आत रस्त्याच्या आतल्या बाजूस येण्यासाठी शेकडो वाहने थांबलेले असतात. त्यामुळे त्याच्या पाठीमागे वाहनांची रांगच लागते. तर दुसरीकडे ह्या मार्गावर कधी काळी बीआरटी ची वाहतूक होते हे सांगणारे अवशेष देखील उपलब्ध आहेत. ह्यामुळे देखील रस्त्यावर कोंडी होत आहे. 

पुलगेट ते गाडीतळ पर्यतच्या रस्त्याचा विचार केला तर तर येथे जवळपास 11 सिग्नल आहेत. या मार्गावर भैरोबा नाला, फातिमा नगर, काळूबाई चौक, रामटेकडी चौक हा भाग अत्यंत रुंद आहे. त्यामुळे ह्या भागातून जाताना वाहनांची गती मंदावते. येथे सायकल ट्रॅक केला पण त्याचा वापर सायकलीसाठी होत नाही. तेव्हा ते काढून टाकणे अधिक सोयीचे ठरेल. ह्या मार्गावर प्रवासी वाहनां बरोबरच मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. रामटेकडी येथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जड वाहतूक त्याकडे वळते. जड वाहतूक देखील अधिक असल्याने  अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचाही परिणाम रस्ते वाहतूकिवर होत आहे. 

बीआरटीचे राहिले केवळ  अवशेष

पुणे - सोलापूर रस्त्यावर कोण्या एके काळी बीआरटी ही वाहतूक सुरू होती हे सांगणारे केवळ आता अवशेष शिल्लक राहिले आहे. तुटलेले दुभाजक ,गतप्राण झालेले बस थांबे हे ताबडतोब बाजूला काढून वाहनांसाठी आता मोकळी जागा उपलब्ध केली पाहिजे. ह्यामुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी दुभाजक फुटलेले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरचे दुभाजक दिसत देखील नाही. त्यामुळे दुचाकी दुभाजकला धडकते तर चारचाकी थेट दुभाजकावर चढते.त्यावेळी वाहतूक सुरळीत करताना मोठ्या अडचणी येतात. हे वाहतूक कोंडीला आमंत्रण देते.  ह्यांना आवरणे कठीण  चौकाच्या सिग्नल थांबलेल्या दुचाकीस्वार हा लाईन कट करून रस्ताच्या पलीकडच्या बाजूस जाण्यास अतिशय घाई करीत असतो. ही संख्या एक दोन नाही तर शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे अरुंद रस्त्याने पुढे जाण्यारी वाहने व वळण घेणारि वाहने असे आपोआप दोन भाग तयार होतात. त्यामुळे पाठीमागे वाहनाच्या रांगा लागायला सुरुवात होते. आशा वाहनधारकांना आवरणे कठीण होते. हे देखील वाहतूक कोंडीत आपले योगदान देतात.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गSolapurसोलापूरTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस