शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 19:03 IST

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला.

पुणे : शहरातील खराडी परिसरातील एका स्टे बर्ड, अझुर सुट नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे मोठी कारवाई केली. पहाटे साडेतीनच्या सुमारास धाड टाकून सुरू असलेली पार्टी पोलिसांनी उधळून लावली गेली.

या पार्टीचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याच्या नावे गेल्या तीन दिवसांपासून हॉटेलचे ३ फ्लॅट बुक होते अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेन सदृश पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच, पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक करण्यात आली. यावेळी घटनास्थळाच्या परिसरातून तीन महिला पसार झाल्याची माहिती आहे.पत्रकार परिषदेदरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. यावेळी रूम नं. १०२ मध्ये डॉ. प्रांजल मनिष खेवलकर (४१, प्लॉट नं. ५७-५८, इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (३५, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, माळवाडी रोड), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (४१, रा. २०५, हेरीटेज पॅलेस, ओर्चिड सोसायटी, एनआयबीएम रोड, सचिन सोनाजी भोंबे (४२, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, वाघोली), कन्स्ट्रक्शन व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (२७, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, पंचतारा नगर, पांडरकर वस्ती, आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (२२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, नागरस रोड, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (२३, रा. गोदरेज ग्रीन को. म्हाळुंगे) यांच्या ताब्यातून २.७० ग्रॅम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट, दारू व बिअरच्या बॉटल्स, हुक्का फ्लेवर हे अमली पदार्थ असे ४१ लाख ३५ हजार ४०० रुपयांचेपदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले.

सातही आरोपींविरोधात खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम ८(क), २२(ब)(।।)अ, २१ (ब), २७ कोटपा ७(२), २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, शैलेश संखे, उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्यासह पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी