शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 18:43 IST

पुण्यातील अमली पदार्थ प्रतिबंधक मोहिमे अतर्गत जी गुपनीय माहिती प्राप्त झाली त्या आधारावर शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले

पुणे -   शहरातील उच्चभ्रू वर्तुळात मोठ्या थाटात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली आहे. खराडी येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटासह एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांना ही माहिती नेमकी कशी मिळाली, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. यासंदर्भात आज पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पार्टीमध्ये कोकेन, दारू, बिअर बॉटल्स, हुक्का व त्याचे साहित्य सापडले. एकूण २.७ ग्रॅम कोकेन, १० मोबाईल फोन्स, तसेच इतर प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. आरोपींमध्ये ५ पुरुष आणि २ महिला सहभागी असल्याचे उघड झाले. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

 प्रांजल खेवलकरसह सात जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडीप्राप्त माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व सातही आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड