डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:49 IST2025-08-19T18:49:10+5:302025-08-19T18:49:16+5:30
९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे

डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणात दहा हजार क्युसेकने पाणी येत आहे, तर धरणाच्या पाच गेटद्वारे पाच हजार क्युसेकने पाणी घोड नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा कुकडी पाटबंधारे विभागाने दिला आहे.
दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ओढ्या-नाल्यांना व नद्यांना पूर आले आहेत. ९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला आहे.
कुकडी पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या असलेल्या मोटारी शेतकऱ्यांनी हलवाव्यात, असेही सांगितले आहे. तसेच पश्चिम घाटाच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या वाड्यांवर त्यांना सतर्क राहण्याचे आव्हान महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धोकादायक गावांवर विशेष लक्ष प्रशासनाने ठेवले असून स्थानिक सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना दिल्या आहेत.