Pune Rain: अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:57 IST2026-04-02T19:55:26+5:302026-04-02T19:57:25+5:30

Pune Rain शहरात सद्यस्थितीला अग्निशमन दलाची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून, २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि जवळपास शंभर जवान कार्यरत आहेत.

Pune Rain Entire Pune flooded due to unseasonal rains; 82 incidents of tree fall in the city, 1 incident of boundary wall collapse | Pune Rain: अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना

Pune Rain: अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना

पुणे : पुण्यात आज दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्त्यांवर फांद्या कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्यातील सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. 

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. दुपारी अडीच ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाडपडीच्या ८२ घटना घडल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे होती. यासह पाणी साचल्याच्या ६ घटना, तर सीमा भिंत पडल्याची १ घटना घडल्याचा कॉल अग्निशमन विभागाला प्राप्त झाला होता. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

नवडी, पुणे विद्यापीठ रोड, बाणेर, चव्हाणनगर, औंध, डीपी, सिंहगड रोड, बिबेवाडी गंगाधाम, जनता वसाहत, नवीन प्रशासकीय इमारत काळेपडळ, तरवडे वस्ती, बेटी गावडे रोड, ससाणेनगर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क, महर्षीनगर, धनकवडी, कात्रज, वारजे, वडगाव शेरी कात्रज आणि पाषाण या ठिकाणी झाडपडीचे कॉल अग्निशमन दलाला आले होते. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू राहणार आहे. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून, २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि जवळपास शंभर जवान कार्यरत आहेत.

Web Title : पुणे में बेमौसम बारिश से जलभराव; पेड़ उखड़े, दीवारें गिरीं

Web Summary : बेमौसम बारिश से पुणे जलमग्न हो गया। कई पेड़ गिरे, जिससे वाहन क्षतिग्रस्त हो गए। दमकल विभाग ने 82 से अधिक पेड़ गिरने और एक दीवार ढहने की घटनाओं पर प्रतिक्रिया दी, जिससे शहर का जीवन अस्त-व्यस्त हो गया।

Web Title : Pune Submerged by Unseasonal Rain; Trees Uprooted, Walls Collapse

Web Summary : Pune was waterlogged due to unseasonal rain. Numerous trees fell, damaging vehicles. Fire brigade responded to over 82 incidents of fallen trees and a collapsed wall, disrupting city life.