Pune Rain: पुण्यात सकाळपासून काही भागात संततधार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:08 IST2025-08-18T13:08:10+5:302025-08-18T13:08:50+5:30
शुक्रवारपासून नागरिकांना सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर आज आठवड्याचा कामाचा पहिला दिवस असून अचानकी सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे

Pune Rain: पुण्यात सकाळपासून काही भागात संततधार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस
पुणे: सकाळपासूनच पुण्यामध्ये काही भागात संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुणे शहरासह उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाने पुणे शहराला झोडपलं आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने लोक कामासाठी बाहेर पडले आहेत. अशातच पाऊस सुरु झाला आहे. शुक्रवारपासून नागरिकांना सुट्ट्या होत्या आणि त्याच्यानंतर आज आठवड्याचा कामाचा पहिला दिवस आहे. दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते आहे.
पावसामुळे पुणे शहरातील वाहतूक काही प्रमाणात मंदावलेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पुणे शहराला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचाच परिणाम याठिकाणी झाला आहे. मुसळधार पावसाने आज पुणे शहराला झोडपलेलं आहे. पुण्यामध्ये मागील आठवड्याभरापासून पाऊस नव्हता. मात्र अचानक अशा पद्धतीने पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्यातला जो ग्रामीण भाग आहे. भोर, मुळशी, आंबेगाव, शिरूर, जुन्नर, जेजुरी मावळ याठिकाणी देखील दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपी सरी येत आहेत.
खडकवासला परिसरात जोरदार पाऊस
खडकवासला धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. असाच दिवसभर पाऊस राहिला तर धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. कारण मागील महिन्यातल्या पावसाने चारही धरणं बऱ्यापैकी भरली होती. त्यावेळी विसर्ग करण्यात आला होता. आता पुन्हा पाऊस सुरु झाला आहे.