प्रवाशांनो काळजी घ्या..! रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:11 IST2025-02-28T13:09:50+5:302025-02-28T13:11:53+5:30
पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपच्या सदस्यांनी त्याला जाब विचारत त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली

प्रवाशांनो काळजी घ्या..! रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री
पुणे :रेल्वे स्टेशन येथे ‘आयआरसीटीसी’च्या नावाने सुरू असलेल्या स्टॉलमध्ये खराब पदार्थांची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी स्टॉलचालकास जाब विचारल्यानंतर त्याने प्रवाशांसोबत वाद घातला. रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री होत असताना रेल्वे प्रशासन करतेय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे रेल्वे स्टेशन येथील आयआरसीटीसी कॉफीशल फास्ट फूड सर्व्हिस सेंटर येथून एका प्रवाशाने बुधवारी वडापाव खरेदी केला; पण तो वडापाव खूपच खराब झाला होता. त्याचा वास येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी स्टॉलचालकास विचारणा केली; पण तो वडापाव खराब झाल्याचे मान्यच करत नव्हता.
@RailMinIndia@GM_CRly@RailwaySeva
— पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@PuneGraminSena) February 26, 2025
पुणे रेल्वे स्टेशन येथे @IRCTCofficial fast food service स्टॉल धारकांकडून खराब आणि वास येणारे पदार्थ विकले जात आहे. ज्यामुळे प्रवाश्याचे जीव धोक्यात आहे. जेव्हा आमच्या प्रतिनिधी कडून विचारण्यात आले, तेव्हा स्टॉलवाल्याकडून वाद घालण्यात आला. pic.twitter.com/AxhB5pfJdE
त्यावेळी पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपच्या सदस्यांनी त्याला जाब विचारत त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थ विक्री केली जात असून, हा प्रवाशांच्या जीवाशी एकप्रकारे खेळच आहे. रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.