पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 06:30 IST2025-12-16T06:30:08+5:302025-12-16T06:30:31+5:30

एलईटी, टीआरएफ या संघटनांचीही नावे केली नमूद 

Pahalgam attack plot uncovered in Pakistan, 1,597-page chargesheet filed against six people! | पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!

पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!

जम्मू: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी सहा जण आणि पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा तसेच तिची संलग्न संघटना टीआरएफ (दी रेझिस्टन्स फ्रंट) या संघटनांविरोधात सोमवारी सविस्तर आरोपपत्र दाखल केले. या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडेवाल्याचा (पोनी ऑपरेटर) मृत्यू झाला होता.

एनआयएने १,५९७ पानांचे हे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानात कसा शिजविण्यात आला होता त्याचा सविस्तर तपशील या आरोपपत्रात देण्यात आला आहे.

साजिद जट्ट याचेही नाव आरोपपत्रात दाखल

भारताविरोधात घातपाती कारवाया करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तय्यबा, हबीबुल्ला मलिक उर्फ साजिद जट्ट प्रमुख असलेल्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याचा कट आखला.

तीन दहशतवाद्यांचीही आरोपपत्रात नावे

पहलगाममध्ये २६ जणांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची नावेदेखील आरोपपत्रात आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर सुमारे १०० दिवसांनी, २९ जुलै रोजी, श्रीनगरजवळील दाचीगाम येथे 'ऑपरेशन महादेव'दरम्यान लष्कराने या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

फैसल जट्ट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहिर उर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी अशी त्यांची नावे आहेत. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी २२ जून रोजी अटक करण्यात आलेले परवेज अहमद आणि बशीर अहमद जोथार या दोन आरोपींची नावेही एनआयएने आरोपपत्रात दिली आहेत.

Web Title : पहलगाम हमले की साजिश पाकिस्तान में; छह के खिलाफ आरोप पत्र दायर।

Web Summary : एनआईए ने पहलगाम हमले के लिए छह व्यक्तियों और लश्कर-ए-तैयबा/टीआरएफ के खिलाफ आरोप पत्र दायर किया, जिसमें 26 लोग मारे गए थे। साजिश पाकिस्तान में रची गई थी, जिसे आतंकवादी संगठनों का समर्थन था। इसमें शामिल तीन आतंकवादी एक ऑपरेशन में मारे गए।

Web Title : Pahalgam attack plotted in Pakistan; chargesheet filed against six.

Web Summary : NIA filed a chargesheet against six individuals and LeT/TRF for the Pahalgam attack, which killed 26 people. The plot was hatched in Pakistan, with support from terrorist organizations. Three terrorists involved were killed in an operation.