नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:13 IST2025-10-13T13:13:26+5:302025-10-13T13:13:59+5:30

इंटरपोलकडून जारी केल्या जाणाऱ्या सात रंगांच्या नोटिसांपैकी ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते

Pune Police seeks 'Blue Corner' notice on Nilesh Ghaywal through International Police Organization | नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न

नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न

पुणे: सध्या फरार असलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला थेट आंतरराष्ट्रीयपोलिस संघटना (इंटरपोल) मार्फत ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून पाठपुरवा केला जात आहे. याबाबत भारत सरकारशी समन्वय साधून घायवळ याला ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया करण्यासाठी पुणेपोलिसांकडून पाठपुरवा करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. घायवळ सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचा ठावठिकाणा निश्चित होत नसल्यामुळे, अखेरीस तपास यंत्रणांनी इंटरपोलकडे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी धाव घेतली आहे. त्या मागणीनुसार इंटरपोलने ही महत्त्वपूर्ण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करावी, असा पाठपुरवा केला जात आहे.

ब्ल्यू कॉर्नर नोटीस म्हणजे काय...

इंटरपोलकडून जारी केल्या जाणाऱ्या सात रंगांच्या नोटिसांपैकी ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही नोटीस थेट अटक करण्याचा आदेश देत नाही (अटकेसाठी ‘रेड कॉर्नर नोटीस’ वापरावी लागते); परंतु त्याचा उद्देश हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. एखाद्या फरार व्यक्तीची ओळख, तिचा सध्याचा ठावठिकाणा आणि ती कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली आहे, याबद्दलची माहिती गोळा करणे, हे या नोटीसचे मुख्य उद्दिष्ट असते. या नोटीसमुळे इंटरपोलचे सदस्य असलेले तब्बल १९६ देश तात्काळ सक्रिय होतात. याचा अर्थ असा की, गुंड नीलेश घायवळ जगात कोणत्याही देशात लपून बसलेला असला, तरी तो एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये दिसल्यास, त्या देशातील स्थानिक पोलिसांना त्वरित त्याची माहिती इंटरपोल आणि भारताला कळवणे बंधनकारक ठरते. थोडक्यात, ही नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या गुन्हेगाराला ‘वॉचलिस्ट’वर टाकणे असे म्हटले जाते.

Web Title: Pune Police seeks 'Blue Corner' notice on Nilesh Ghaywal through International Police Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.