शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा प्रकरणी मुख्य उत्पादक छाजेड बंधुंना पुणे पोलिसांनी केली मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 09:27 IST

पुणे पोलिसांनी मागील दोन महिन्यात २८ ठिकाणी छापे टाकून १५ कोटी रुपयांहून अधिकचा अवैध गुटखा जप्त केला होता.

पुणे : पुणेपोलिसांनी गुटखा विरोधी मोहिमेअंतर्गत गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्व्हासा या ठिकाणी छापे टाकून तब्बल १५ कोटी रुपयांहून अधिकचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी सिल्व्हासा येथील कारखान्यात गुटख्याचे उत्पादक करणाऱ्या छाजेड बंधुंना पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून शहरात येणाऱ्या गुटख्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

अभिषके सुरेंद्र छाजेड (वय ३१) आणि शरण सुरेंद्र छाजेड (वय २६, रा. ग्रीन एकर, लोखंडवाला कॉम्पेक्स) अशी अटक केलेल्या मुख्य उत्पादकांची नावे आहेत. याप्रकरणी अनुष्का ट्रान्सपोर्टचा प्रदीप शर्मा, सुरक्षा व्यवस्थापक संतोषकुमार चौबे, मिथून नवले (रा. गणेशनगर), विकास कदम (रा. मांजरी), सतीश वाघमारे (रा. उंड्री) यांनाही अटक करण्यात आली आहे.

सिल्व्हासा येथील गलोंडत्त गावात ज्या कारखान्यात गुटख्याचे उत्पादन होते. ती जागा गोवा गुटख्याचे मालक जगदीशप्रसाद जोशी यांच्या मालकीची आहे. छाजेड बंधुंनी ती भाडेतत्वावर घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांची काशी व्हेंचर्स नावाने कंपनी आहे.

पुणे पोलिसांनी मागील दोन महिन्यात २८ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा जप्त केला होता. त्यातील आरोपींच्या चौकशीत हा गुटखा वापी व दादरा नगर हवेली येथून येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कारवाई करुन १५ कोटींहून अधिकचा माल जप्त केला होता. कारखान्यात संतोषकुमार चौबे हा सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम पहात होता. कारखान्यात तयार होणारा गुटखा कोठे पाठविला जातो, याची आवक जावकाची सर्व माहिती चौबे ठेवत असे. तो ही माहिती छाजेड बंधुंना पाठवित असे, अशी माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे कारवाई करुन छाजेड बंधुंना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.या प्रकरणात आणखी काही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसcommissionerआयुक्त