Pune platform for covid response and adminsitration manages to avert oxygen crisis in city. Manages to purchase 12 oxygen generator plants | Covid oxygen crisis : पुण्याने करून दाखवलं!; २४ तासांत भागवली शहराच्या ऑक्सिजनची गरज

Covid oxygen crisis : पुण्याने करून दाखवलं!; २४ तासांत भागवली शहराच्या ऑक्सिजनची गरज

पुणे: नाशिकमध्ये ऑक्सिजन अभावी २२ लोकांना जीव गमवावा लागला . पण त्याच्याच एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी पुण्यातही अशी परिस्थिती ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे येतेय का काय अशी अवस्था होती. पण उद्योजक आणि प्रशासनानने एकत्र येत २४ तासांच्या आत जिल्ह्याची गरज तर भागवलीच पण त्यात बरोबर १२ नवे ॲाक्सिजन जनरेटर प्लांट खरेदी करत शहरासाठी पुढचा काळातली देखील तरतूद केली आहे. 

मंगळवारचा दिवस पुण्यात उजाडला तोच ॲाक्सिजनचा तुटवड्याने .. कुठे रुग्णालयांनी पेशंट घेणं थांबवले तर कुठे पेशंटना शिफ्ट करायची धावपळ सुरु होती. या गोंधळातच ॲाक्सिजन मिळवण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी रात्रभर जागुन प्रयत्न करत होते.. पण आभाळ फाटले तर ठिगळं किती लावणार अशी परिस्थिती.. मग सुरु झाली ती युद्धपातळीवरची धावपळ. 

एकीकडे ॲाक्सिजन पुरवठा आहे त्यात तो भागवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दुसरीकडे नव्याने ॲाक्सिजन पुरवठा कसा होईल याची धावपळ सुरु होती. पहिल्या टप्प्यात ॲाडिट करुन ॲाक्सिजनची गरज कमी केली. पेशंटला गरजे इतकाच ॲाक्सिजन पुरवला जाईल यासाठी प्रयत्न सुरु झाले. दिवसभरातच खासगी रुग्णालयातले १२०० तर सरकारी रुग्णालयांमधले ३०० पेशंट हे स्टेप डाऊन पद्धतीने त्यांच्या गरजेच्या ट्रीटमेंटला शिफ्ट करण्यात आले. दुसरीकडे रुग्णालयांच्या गरजेनुसार ॲाक्सिजन पुरवण्यासाठी धडपड केली गेली. पण हे देखील पुरेसं नव्हतं.  

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मते “ दोन दिवसांच्या धावपळीनंतर गरजेइतकाच पुरवठा मिळत आहे. आता औद्योगिक क्षेत्रातुन मदत उभी राहाते आहे. काही कंपन्या ज्या सध्या बंद आहेत त्या ॲाक्जिन पुरवठा करायला पुढे आल्या आहेत. याबरोबरच जे एस डब्ल्यु कडुन ३० मेट्रिक टन पुरवठा सुरु झाला आहे. पण ते देखील पुरेसं ठरणार नाहीये. गरज वाढली तर काय यासाठी तयारी करणं गरजेचं होतं.”

अशातच पुणे प्लॅटफॅार्म फॅार कोव्हीड रिस्पॅान्स चा सुधीर मेहता यांना औरंगाबादच्या एका कंपनीच्या माणसाकडे १२ ॲाक्सिजन जनरेटर  प्लांट असल्याची माहिती मंगळवारी रात्री मिळाली. “ मला रात्री कळालं की आत्ताचे शेवटचे तयार १२ प्लांट या कंपनी कडे उपलब्ध आहेत. मंगळवारी रात्री कळाल्यावर तातडीने त्याच्या मालकाशी संपर्क साधला. त्याला हे प्लांट पुण्यासाठी राखीव ठेवायला सांगितलं.. अर्थात हे केलं तरी पैसे देई पर्यंत ते प्लांट मिळणार नव्हतेच. मग अधिकारी आणि वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधुन पैसा उभा करण्याची धडपड सुरु झाली. वेळ कमी होता आणि काम जास्त. थोडा उशीर झाला तर ते प्लांट इतर कुठे दिली जाण्याची भीती होती असे सुधीर मेहता म्हणाले. 

अखेर उद्योजक प्रशासन आणि राजकारणी एकत्र आले आणि आज १२ प्लांट खरेदी करण्याच्या ॲार्डरही गेल्या. यासाठी बजाज , टाटा आणि रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनने पैसा उभा केला. तर महापालिकेने थेट महापौर निधीच खर्च करायचं ठरवलं. 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “ पुणे शहरासाठी महापौर निधीमधुन दीड कोटींची तरतूद करुन प्लांट घेतला आहे. हा प्लांट नायडू रुग्णालयात बसवला जाणार आहे. त्यातुन आपल्याला मोठा दिलासा मिळेल. साधारण दहा दिवसांत हा प्लांट कार्यान्वीत होईल.” पुढच्या काही दिवसांत खासगी आणि सरकारी रुग्णालयातून हे प्लांट बसवले जातील. याबरोबरच ॲाक्सिजन कॉन्संट्रेटर देखील खरेदी केले जाणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune platform for covid response and adminsitration manages to avert oxygen crisis in city. Manages to purchase 12 oxygen generator plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.