तुम्हीच सांगा, फुटपाथवरून चालायचे कसे आणि कुठे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:03 IST2026-04-16T13:02:38+5:302026-04-16T13:03:38+5:30

विश्रामबाग वाड्याच्या समोरील बाजूस एका मिठाई दुकानाच्या फुटपाथवरही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

pune news you tell me, how and where to walk on the sidewalk | तुम्हीच सांगा, फुटपाथवरून चालायचे कसे आणि कुठे? 

तुम्हीच सांगा, फुटपाथवरून चालायचे कसे आणि कुठे? 

पुणे : विश्रामबाग वाडा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरू असून, या भागातील फुटपाथ पूर्णपणे बंद आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. रस्त्यावरून चालत असताना मागून येणाा्या वाहनांची भीती बाळगत जीव मुठीत धरून चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

दिवसभर तुळशीबाग परिसर अत्यंत वर्दळीचा असतो. कुमठेकर रस्त्याकडून आणि मंडई मार्गावरून आप्पा बळवंत चौकाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची दमछाक होते. यात आता भर विश्रामबाग वाडा दुरुस्तीचे काम सुरू आहे. विश्रामबाग वाड्याच्या समोरील बाजूस एका मिठाई दुकानाच्या फुटपाथवरही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात माल मांडून ठेवला असल्यामुळे एका बाजूचा फुटपाथ दुरुस्तीमुळे अडवण्यात आला असून, दुसा्या बाजूचा फुटपाथ हा विक्रेत्यांनी व्यापला आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, ‘नेमके चालायचे कसे आणि कुठे?’ असा संतप्त सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. या सर्व परिस्थितीत पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कारवाईचा देखावा न करता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. 

विश्रामबाग वाडा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम  सुरू असल्याने फुटपाथ पूर्णपणे बंद आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून रस्त्यावरून चालावे लागत आहे. याच परिसरातील विरुद्ध बाजूच्या फुटपाथवरही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या परिसरात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर वस्तू मांडून ठेवल्या असल्यामुळे संपूर्ण फुटपाथ अडवला गेला आहे. रस्त्यावरून चालताना वाहनांचा वेग, बस आणि दुचाकींची गर्दी यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना चालावे लागत आहे. - मिलिंद किर्लोस्कर, नागरिक 

Web Title : पुणे: कहाँ चलें? फुटपाथ मरम्मत और विक्रेताओं द्वारा अवरुद्ध।

Web Summary : पुणे में विश्रामबाग वाडा फुटपाथ मरम्मत और अतिक्रमण के कारण अवरुद्ध है, जिससे पैदल चलने वालों को सड़क पर चलने के लिए मजबूर होना पड़ रहा है। यातायात के बीच असुरक्षित पैदल चलने से सुरक्षा चिंताएँ बढ़ रही हैं और प्रशासनिक कार्रवाई की मांग हो रही है।

Web Title : Pune: Where to walk? Footpaths blocked by repairs, vendors.

Web Summary : Pune residents struggle to walk safely as Vishrambaug Wada footpath is blocked due to repairs and vendor encroachments. Pedestrians are forced onto roads amidst traffic, raising safety concerns and demands for administrative action.