महिला अन् विद्यार्थ्यांना विनामूल्य बघता येणार शिवसृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:59 IST2026-05-01T17:58:39+5:302026-05-01T17:59:05+5:30

- या देणगीमुळे महिला व १८ वर्षाखालील मुलामुलींना शिवसृष्टी विनामूल्य पाहता येणार

pune news women and students will be able to watch Shivsruthi for free | महिला अन् विद्यार्थ्यांना विनामूल्य बघता येणार शिवसृष्टी

महिला अन् विद्यार्थ्यांना विनामूल्य बघता येणार शिवसृष्टी

पुणे - महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेली शिवसृष्टी अभय भुतडा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे महिला व १८ वर्षांखालील मुलामुलींसाठी दि.१ मे ते २७ जून यादरम्यान विनामूल्य पाहता येणार आहे. अभय भुतडा फाउंडेशनच्या सातत्याने मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आम्ही अभय भुतडा फाउंडेशनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या देणगीमुळे महिला व १८ वर्षाखालील मुलामुलींना शिवसृष्टी विनामूल्य पाहता येणार आहे. 

यानुसार नमूद केलेल्या कालावधीत आम्ही महिला व १८ वर्षांखालील शालेय मुलामुलींसाठी शिवसृष्टी विनामूल्य पाहण्याची सुविधा उपलब्ध करत आहोत, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली.

शिवप्रेमींनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन स्लॉट बुक करणे गरजेचे आहे. गैरसोय टाळण्यासाठी शिवप्रेमींनी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरच शिवसृष्टी पाहण्यासाठी यावे. ऑनलाइन बुकिंग केले असेल तरच आत प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी,असेही कदम यांनी नमूद केले.

महिला व मुलांमुलींना प्रवेश

लोकमत सखीच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना अभिवादन करून महाराष्ट्रातील सखी सदस्य आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांना या मोहिमेचा लाभघेता येणार आहे. 'लोकमत'च्या माध्यमातून राज्यातील कॅम्पस क्लब सदस्यांशी बोलल्यानंतर घराघरात शिवसृष्टी पोहोचविण्याचा विचार मनात आला, असे अभय भुतडा यांनी म्हटले.

Web Title : शिवसृष्टि में महिलाओं और छात्रों के लिए मुफ्त प्रवेश, दान से संभव

Web Summary : अभय भुतड़ा फाउंडेशन के सौजन्य से शिवसृष्टि में 1 मई से 27 जून तक महिलाओं और 18 वर्ष से कम उम्र के छात्रों के लिए मुफ्त प्रवेश। ऑनलाइन बुकिंग अनिवार्य है। लोकमत सखी सदस्य भी इस अवसर का लाभ उठा सकते हैं।

Web Title : Shivsrushti Offers Free Entry for Women and Students, Courtesy of Donation

Web Summary : Thanks to Abhay Bhutada Foundation, Shivsrushti offers free entry to women and students under 18 from May 1st to June 27th. Online booking is mandatory. Lokmat Sakhi members can also avail of this opportunity.