पुणे - पुण्यातील नरपतगिरी चौकात घडलेल्या एका विचित्र घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, हा तरुण तब्बल दोन तास एकाच जागी स्तब्ध उभा असल्याचा दावा केला जात आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित तरुण कोणतीही हालचाल न करता रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसत आहे. या अवस्थेमागे नशेच्या पदार्थांचे सेवन कारणीभूत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काही नेटिझन्सनी याला थेट ‘झॉम्बी ड्रग्स’चा परिणाम असल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये ‘झॉम्बी ड्रग्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घातक अमली पदार्थांमुळे व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडते. संबंधित व्यक्ती बराच वेळ बधीर अवस्थेत राहते, असे सांगितले जाते. पुण्यात वायरल झालेल्या या व्हिडिओनंतर अशाच प्रकारच्या नशेची शहरात एन्ट्री झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित तरुणाने नेमक्या कोणत्या पदार्थाचे सेवन केले होते, याबाबत पोलिस किंवा आरोग्य विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे पुण्यातील तरुणाई वाढत्या नशेच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात असून, नागरिकांकडून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
Web Summary : A video from Pune shows a youth standing motionless for two hours, sparking fears of 'zombie drugs.' The incident raises concerns about drug use among Pune's youth. Police investigation urged.
Web Summary : पुणे से एक वीडियो में एक युवक दो घंटे तक गतिहीन खड़ा दिखाई दे रहा है, जिससे 'ज़ोंबी ड्रग्स' का डर पैदा हो गया है। घटना पुणे के युवाओं में नशीली दवाओं के उपयोग के बारे में चिंता बढ़ाती है। पुलिस जांच का आग्रह किया गया।