एका वेेळी २०० रुपयांचा पिझ्झा बर्गरला खर्च करणाऱ्यांना महाग साखर परवडत नाही; जाचकांनी मांडले कारखानदारीचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:13 IST2025-10-03T19:12:49+5:302025-10-03T19:13:05+5:30
महाग झालेल्या सोन्याला झळाळी आल्याचे संबोधले जाते.साखरेसाठी मात्र वेगळं गणित. पिकविणार्यापेक्षा साखर खाणार्यांची संख्या अधिक आहे.

एका वेेळी २०० रुपयांचा पिझ्झा बर्गरला खर्च करणाऱ्यांना महाग साखर परवडत नाही; जाचकांनी मांडले कारखानदारीचे गणित
बारामती/सणसर : साखरेचा खप १८ ते २० किलो प्रतिमाणशी प्रतिवर्ष असा आहे.त्या गणितानुसार प्रति कुटुंबाचा प्रति वर्ष खर्च २०० रुपये येतो,तो प्रतिदिन अवघा ७ रुपये येतो.मात्र, एका वेळी पिझ्याला २०० रुपये खर्च करणार्यांना प्रतिदिन ७ रुपये खर्च अधिक वाटतो,हे वास्तव आहे.पण यावर कोणी बोलायला तयार नाही,यावर चर्चा होणे आवश्यक आहे. महाग झालेल्या सोन्याला झळाळी आल्याचे संबोधले जाते.साखरेसाठी मात्र वेगळं गणित. पिकविणार्यापेक्षा साखर खाणार्यांची संख्या अधिक आहे. कोणतही सरकार त्यांचीच बाजु घेतं,अशा शब्दात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी साखर कारखानदारीचे गणित मांडले. कारखान्याचा ७० वा बॉयलर अग्निपदीपण समारंभ संचालिका माधुरी राजपुरे व त्यांचे पती सागर राजपुरे व युनिट नंबर दोनचा सुचिता सपकळ व त्यांचे पती सचिन सपकळ यांच्या हस्ते पार पडला.
अध्यक्ष जाचक पुढे म्हणाले, छत्रपती कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आपल्याच कारखान्यास ऊस घालावा. येणाऱ्या काळात खोडवा उसास अनुदान देण्याचा विचार संचालक मंडळ करत असल्याचे जाचक म्हणाले. यावेळी माजी अध्यक्ष प्रशांत काटे, भाजप नेते तानाजी थोरात, अॅड. संभाजी काटे, अशोक काळे, राजाराम रायते, रवींद्र टकले, विशाल पाटील,संतोष चव्हाण, यांनी भाषणे केली. प्रस्ताविक कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन कामगार नेते युवराज रणवरे यांनी,तर आभार कैलास गावडे यांनी मानले.
‘छत्रपती’ने एकेकाळी सभासदांना राज्यात विक्रमी भाव,तसेच कामगारांना ५१ टक्के बोनस दिल्याची आठवण श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितली.सर्वांनी साथ द्या,आपल्याला पुन्हा ते दिवस आणायचे आहेत,असे भावनिक आवाहन अध्यक्ष जाचक यांनी केले.
‘छत्रपती’च्या गाळपासाठी एकेकाळी कर्नाटक मधुन गेटकेन १२ पेक्षा अधिक ‘रीकव्हरी’ असणारा ऊस आणण्यात आला हाेता.त्यासाठी संबंधितांना त्यावेळी कोणत्याही गाड्या देण्यात आल्या नव्हत्या. त्यावेळी ऊस आणणारे कर्मचारी कर्नाटक मध्ये दिड दोन महिने मुक्कामी असतं.ते कन्नड भाषा बोलायला शिकले होते,अशी आठवण अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितली.