पीएफआय संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करत ज्येष्ठाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 12:05 IST2026-04-26T12:04:56+5:302026-04-26T12:05:06+5:30

पुणे : पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करून औंध भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी ...

pune news senior citizen cheated of Rs 1 crore 17 lakhs by pretending to be associated with PFI organization | पीएफआय संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करत ज्येष्ठाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

पीएफआय संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करत ज्येष्ठाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

पुणे : पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करून औंध भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक १३ मार्च ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत झाली आहे. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर सोशल मीडियाचा वापर करून संपर्क साधला. चोरट्यांनी पोलिसांसारखा युनिफॉर्म परिधान केला होता. पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्याचे चोरट्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाकडे अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी केली.

यावेळी घाबरलेल्या ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी १७ लाख ८७ हजार रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे पुढील तपास करत आहेत.

Web Title : पीएफ़आई कनेक्शन बताकर वरिष्ठ नागरिक से ₹1.17 करोड़ की धोखाधड़ी

Web Summary : पुणे: औंध में एक वरिष्ठ नागरिक को साइबर अपराधियों ने पुलिस बनकर ₹1.17 करोड़ का चूना लगाया। उन्होंने झूठा दावा किया कि उनके बैंक खाते के पीएफ़आई आतंकी संबंध हैं और गिरफ्तारी के डर से पैसे वसूले। पुलिस में शिकायत दर्ज।

Web Title : Senior Citizen Duped of ₹1.17 Crore in PFI Connection Scam

Web Summary : Pune: A senior citizen in Aundh was defrauded of ₹1.17 crore by cybercriminals posing as police. They falsely claimed his bank account had PFI terror links and extorted money under threat of arrest. A police complaint has been filed.