शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
2
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
3
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
4
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
5
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
6
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
7
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
8
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
9
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
10
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
11
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
12
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
13
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
14
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
15
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
16
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
17
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
18
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
19
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत १० लाखांहून अधिक रेल्वे प्रवाशांना ‘तत्काळ’ तिकिटाचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:43 IST

- ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना तत्काळ तिकिटाचा दिलासा

पुणे : ऐनवेळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून तत्काळ तिकिटाची साेय करण्यात आली आहे. यामध्ये एसी तिकिटासाठी सकाळी १० वाजता आणि स्लीपर तिकिटासाठी ११ वाजता तत्काळ तिकिटाचा कोटा खुला केला जातो. पुणे रेल्वे विभागातून एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत १० लाख ७७ हजार १०० प्रवाशांनी तत्काळ तिकीट काढून प्रवास केला. यामध्ये पुण्यातून तत्काळ तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे विभाग महत्त्वाचा आहे. पुण्यातून दररोज २०० हून अधिक रेल्वेगाड्यांची ये-जा असते. यामध्ये पुणे स्थानकावरून ७२ रेल्वेगाड्या सुटतात. यामुळे प्रवाशांची गर्दी कायम असते. शिवाय रेल्वेचे तिकीट दोन महिने अगोदर आरक्षित करण्याची सुविधा आहे. त्यामुळे पूर्व नियोजित प्रवाशांकडून आरक्षण केले जाते; परंतु ऐनवेळी प्रवाशांसाठी रेल्वेकडून तत्काळ आरक्षण कोटा उपलब्ध करून दिला आहे. दररोज सकाळी १० आणि ११ वाजता तत्काळ तिकिटाचा कोटा खुला करण्यात येतो. यामध्ये तिकीट काढताना आधार नंबर टाकल्यावर ओटीपी येतो आणि त्यानंतर तिकीट काढता येते.

असा असतो स्लीपर, एसी तत्काळ तिकिटाचा कोटा :- जवळच्या आणि लांबपल्ल्याच्या प्रत्येक गाडीला तत्काळ तिकिटाचा कोटा असतो.- २४ डब्यांची गाडी असेल, तर स्लीपरचे २० ते ३० आणि एसटीचे ५ ते १० तत्काळ तिकीट उपलब्ध असतात.- १८ ते २० डब्यांची गाडी असेल, तर स्लीपरचे १५ ते २० आणि एसटीचे ५ ते ७ तत्काळ तिकीट उपलब्ध असतात.- दररोज सकाळी १० वाजता एसटी तत्काळ तिकिटाचा कोटा खुला होतो.- तसेच सकाळी ११ वाजता स्लीपर तत्काळ तिकिटाचा कोटा खुला होतो.

पुण्यातून ६ लाखांहून अधिक तत्काळ तिकीट :पुणे रेल्वे विभागात कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, हडपसर आणि शिर्डी ही मोठी रेल्वेस्थानके आहेत. या स्थानकांवरून तत्काळ तिकीट काढून प्रवास केला जातो. गेल्या सहा महिन्यांत पुण्यातून सर्वाधिक ६ लाख ३८ हजार ३४४ प्रवाशांनी तत्काळ तिकीट काढले आहे. त्यानंतर कोल्हापूर स्थानकावरून एक लाख ७७ हजार २४९, शिर्डी ९८ हजार १३० तिकीट काढण्यात आले.

अशी आहे आकडेवारी :

रेल्वेस्थानक ---- तिकीट काढणाऱ्यांची संख्या

पुणे -- ६,३८,३४४शिर्डी -- ९८,१३०कोल्हापूर -- १,७७,३४९हडपसर --७७,०१८दाैंड --३३,७७९सांगली --३४,५१५सातारा--१३०४९मिरज-- ४,८१६ 

 प्रवाशांच्या सोयीसाठी जवळच्या आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीत तत्काळ तिकिटाचा कोटा उपलब्ध आहे. हा कोटा दररोज सकाळी उपलब्ध होतो. पुणे विभागातून गेल्या सहा महिन्यांत १० लाखांहून अधिक प्रवाशांनी तत्काळ तिकीट काढून प्रवास केला. यामध्ये पुण्यातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.  - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Over 1 Million Railway Passengers Benefit from 'Tatkal' Tickets in Six Months

Web Summary : Pune Division saw over 1 million passengers using Tatkal tickets in six months. Pune leads with 6.38 lakh users. Tatkal quota opens daily; AC at 10 AM, Sleeper at 11 AM, aiding last-minute travel.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpassengerप्रवासीrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी