शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:07 IST

Local Body Election Counting postpone Story: अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची.

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला पार पडले. अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. यावरून राज्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. यामागे नेमके काय घडले, कोणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराने हा निकाल पुढे ढकलण्यास लावला याची माहिती समोर आली आहे. 

वर्ध्यात नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे वर्ध्यातील प्रभाग क्रमांक 9 ब चे  उमेदवार प्रदिपसिंग ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या नामांकन अर्जावर आक्षेप घेतल्यावर हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात गेले होते. त्यानंतर ते उच्च न्यायालयात देखील गेले होते. 

निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रभागाची निवडणूक आदल्याच दिवशी रद्द करत असल्याची नोटीस पाठविली होती. तसेच ही निवडणूक पुढे ढकलली होती. परंतू, महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकीचा  मतमोजनीचा दिनांक मात्र तीन डिसेंबर हा कायम ठेवण्यात आला होता. हा निकाल आपल्या प्रभागासाठी होणाऱ्या 20 डिसेंबरच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणार असा आक्षेप ठाकूर यांनी घेत नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे धाव घेतली होती. 

याचिका दाखल करीत निवडणूक निकाल हा पुढील निवडणुकीवर आणि मतदारावर प्रभाव टाकाणारा ठरेल असा युक्तिवाद प्रदिपसिंग ठाकूर यांच्याकडून करण्यात आला. त्यावर न्यायालयाने मतमोजणीच पुढे ढकलण्याचा निकाल दिला. यामुळे ही मतमोजणी आता आज म्हणजेच ३ डिसेंबरऐवजी ठाकूर यांच्या प्रभागातील निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबरला केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Who Filed Petition to Postpone Maharashtra Nagar Panchayat Election Counting?

Web Summary : BJP's Pradipsingh Thakur filed a petition in High Court regarding his ward's election. He argued early counting would influence voters. Court postponed counting to December 21st.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBJPभाजपाElectionनिवडणूक 2024