पुणे हादरले! 'माझ्याशी लग्न कर नाहीतर ठार करेन'; ११ वर्षाच्या मुलीला लॉजवर नेऊन केले अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:02 IST2025-03-28T14:00:40+5:302025-03-28T14:02:14+5:30
तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली

पुणे हादरले! 'माझ्याशी लग्न कर नाहीतर ठार करेन'; ११ वर्षाच्या मुलीला लॉजवर नेऊन केले अत्याचार
- किरण शिंदे
पुणे - पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर मारून टाकेन,” अशी धमकी देत शेजाऱ्याने 1 1 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील उत्तमनगर येथील एका लॉजवर 1 1 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. 21 मार्चला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी दुकानात जात असताना आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार अविनाश डोमपल्ले यांनी तिला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला मारून टाकेन,” अशी धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी राहुल गौतम, अविनाश अशोक डोमपल्ले, पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉज मॅनेजर टिकाराम चपाघई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.