शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

PMRDA : बारामती तालुका 'पीएमआरडीए'मध्ये समावेशाच्या हालचाली

By नारायण बडगुजर | Updated: September 13, 2025 13:20 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सध्या नऊ या तालुक्यांतील निवडक भागांचा समावेश

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत सध्या नऊ तालुक्यांचा समावेश आहे. त्यात वाढ करून बारामती तालुक्याचाही पीएमआरडीए कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पीएमआरडीए हद्दीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे, मावळ, मुळशी आणि हवेली हे तालुके, तसेच भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांतील निवडक भागांचा समावेश आहे.

या भागातील रस्ते, तसेच सुनियोजित नागरीकरणासह विविध विकासकामे पीएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहेत. बारामती शहर आणि तालुक्यातही नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील रस्ते व इतर नियोजित विकासासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. त्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीत समावेशाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पीएमआरडीएच्या निधीवर डोळा ?पुणे महानगर क्षेत्रातील रस्ते, विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी पीएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येतो. हजारो कोटींच्या ठेवी असल्याने विकासकामांसाठी शासकीय निधीवर अवलंबून राहावे लागत नाही. बारामती परिसरातील विकासकामांसाठी हा निधी वापरण्याचा डाव असू शकतो, अशी चर्चा आहे.

पीएमआरडीए प्रशासन म्हणते...समावेशामुळे बारामती तालुक्यात रस्त्यांचे जाळे, नियोजित नागरीकरणास मदत होईल. पीएमआरडीएला विविध परवानग्या आणि इतर माध्यमातून उत्पन्न मिळेल. समावेश करायचा किंवा नाही याबाबत शासनस्तरावरून निर्णय होईल.बारामती तालुकालोकसंख्या : ३५५८३९नगर परिषद :१नगरपंचायत :महसुली गावे : ११३ग्रामपंचायती  : ९९

पीएमआरडीएचे सध्याचे कार्यक्षेत्रपीएमआरडीएचे क्षेत्रफळ: ६,९१४ चौरस किलोमीटरलोकसंख्या : ७३.२१ लाख (अंदाजे)महापालिका : २छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) : ३नगरपालिका परिषद ः ७नगरपंचायत : २अंतर्गत गावे : ६९७

शासनाकडे अहवाल सादरबारामती तालुका पीएमआरडीएमध्ये समावेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाकडून सूचना करण्यात आल्यानंतर अहवाल देण्यात आला. 

 बारामती तालुका कार्यक्षेत्राचा पीएमआरडीए हद्दीत समावेशाबाबत शासनाकडून अहवाल मागविण्यात आला. तो सादर केला आहे. समावेशाबाबत शासन निर्णय घेईल. - अविनाश पाटील, संचालक, परवाना व नियोजन विभाग, पीएमआरडीए 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस